बंगळुरू - देशाच्या सीमेचा विस्तार करण्याची सध्या कोणतीही योजना नाही. मात्र, शत्रूंनी ताबा मिळवलेली
आपली जमीन भारत परत घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी केला व्यक्त केला आहे.
वायुसेनेचे माजी अध्यक्ष एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे स्मारक व्याख्यानावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सीमा संरक्षणाच्या बाबतीत भारताची स्थिती सध्या धोकादायक आहे. ही स्थिती ब्रिटिशांमुळेच आली आहे. सीमा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, याला युद्धाची तयारी समजली जाऊ नये.
भारताचा शेजारील राष्ट्र चीनची क्षेत्रीय विस्तारावर जास्त भर आहे. मागच्या काही दिवसांपासून चीनच्या छुप्या कारवायांवरून हे दिसून येत आहे. आशिया प्रशांत क्षेत्रावर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन असे कारस्थान करत असल्याचेही राहा यांनी या वेळी म्हटले.