आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशावर हल्ला झाल्यास आम्ही गोळ्या मोजणारही नाही, पाकिस्तानच्या भूमिकेवर राजनाथ बरसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनाथ सिंह यांनी मुनाबाव पोस्टवर बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. राजनाथ सिंह पोहोचले त्यावेळी जवान लंच करत होते. सिंह यांनी बराचवेळ सीमेवर तैनात असलेल्या या जवानांबरोबर घालवला. - Divya Marathi
राजनाथ सिंह यांनी मुनाबाव पोस्टवर बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. राजनाथ सिंह पोहोचले त्यावेळी जवान लंच करत होते. सिंह यांनी बराचवेळ सीमेवर तैनात असलेल्या या जवानांबरोबर घालवला.
बाडमेर - राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारत कोणावरही हल्ला करत नाही, पण आमच्या देशावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देताना गोळ्याही मोजणार नाही. राजस्थानातील पाकला लागून असलेल्या मुनाबाव बॉर्डरवर सिंह यांनी हे वक्तव्य केले. सिंह याठिकाणी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. होम मिनिस्टर सिंह यांनी बीएसएफच्या टॉवरमधून स्वतः पाकिस्तानी सीमेवरील हालचालींची माहिती घेतली.

आणखी काय म्हणाले सिंह..
- मुनाबाव पोस्टवर राजनाथ यांनी बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. जवान लंच करत होते, त्याठिकाणी सिंह पोहोचले.
- सरकार सीमेवरील इन्फास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.
- फ्लडलाइट्स, फेन्सिंगबरोबरच समांतर रस्तेही लवकरच तयार केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
- होम मिनिस्टर म्हणाले, आम्ही वसुधैव कुटुंबकमच्या परंपरेवर विश्वास ठेवतो. दुसऱ्याच्या भूमीवर डोळा ठेवणे आमचा स्वभाव नाही. आम्ही युद्धाची सुरुवातही करत नाही. पण आमच्यावर हल्ला झाला तर एकदा ट्रिगर दबल्यानंतर आम्ही गोळ्या मोजणारही नाही.

जवानांना सलाम..
- राजनाथ यांनी अनेक अडचणींनंतरही सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करत त्यांचे कौतुक केले. काही ठिकाणी फेन्सिंग खराब झाले असून ते रिपेयर केले जाणार असून ठरावीक वेळेनंतर त्याची पाहणी होणार असल्याचेही सांगितले.
- बॉर्डरवर काही भागांत कनेक्टीव्हीटीची समस्या आहे. त्याठिकाणी नवे टॉवर लावले जातील. तसेच बीएसएफला अधिक सॅटेलाइट फोन देणार असल्याचेही ते म्हणाले.
- त्याशिवाय बुलेटप्रूफ जॅकेट्सची कमतरताही लवकरच दूर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ही समस्यादेखिल सोडवली जाईल असे, ते म्हणाले. राजनाथ यांना जेव्हा वाळवंटी भागात पेट्रोलिंगदरम्यान वापराव्या लागणाऱ्या गणवेशाबाबत सांगण्यात आले. त्यावर त्यांनी लवकरच विचार करण्याचे आश्वासनही दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राजनाथ यांच्या सीमेवरील भेटीदरम्यानचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...