जोधपूर (राजस्थान) - कुडी येथे सोमवारी सकाळी फायटर जेट मिग-27 विमान कोसळले. लँडिंगवेळी ही दुर्घटना झाली. विमान कोसळताना त्यात आग लागली. विमान कोसळण्याआधी दोन्ही पायलट्सने उडी मारल्याचे वृत्त आहे. ज्या घराजवळ विमान कोसळले त्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जण जखमी असल्याची माहिती आहे.
अशी झाली दुर्घटना
- जोधपूर एअरबेसवरुन दररोज कित्येक विमान कुडी येथून टेक ऑफ आणि लँडिंग करतात.
- सोमवारी सकाळी फायटर जेट मिग-27 लँडिंग दरम्यान तांत्रिक कारणामुळे कोसळले.
- पायलटने हे विमान भरवस्तीत पडणार नाही याचा पूर्ण प्रयत्न केला. यात काही अंशी तो यशस्वी झाला, एका घराच्या शेजारी मोकळ्या जागेत विमान कोसळले. यामुळे घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घराजवळ कोसळले जेट विमान...