आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Air Force Helicopter Caressed Sitapur Uttar Pradesh

हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सातही जवान ठार, पाहा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतापूर - हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील सीतापूरजवळ कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जवान ठार झाले. हे हेलिकॉप्टर एएलएच ध्रुव श्रेणीतील होते.

सिधौलीचे एसडीएम ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरला आग लागली होती. ते अटारियाच्या मणिपूर्वा भागात कोसळले. कोसळण्यासआधी पायलटने बक्शीतालाब एअरफोर्स व लखनऊ येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.

हेलिकॉप्टरमे बरेली येथून उड्डाण घेतले होते आणि ते अलाहाबादकडे निघाले होते, अशी माहिती सीतापूरचे जिल्हा दंडाधिकारी जे. पी. सिंह यांनी दिली.
पुढे पाहा, या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ (शेवटच्या स्लाइडमध्ये)...