आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात अशी असते लष्करी जवानांची Life, व्हायरल झाले आहेत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे अनेक ग्रुप आणि पेजेस आहेत. यावर अनेक फोटो शेअर केले जातात. या फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. 'जय हिंद की सेना' नावाच्या एका ग्रुपने नुकतेच काही फोटो शेअर केले. यात जंगलात तैनात असलेल्या जवानांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे.
जेथे सुरक्षित जागा मिळेल तेथे जेवण
- जंगलात तैनात असताना जेवणाच्या काही वेळा नसतात. जेथे सुरक्षित जागा मिळेल तेथे जेवण आटोपले जाते.
- कोणत्याही ठिकाणी चौकी उभारली असेल तर तेथे सुरक्षेसाठी काही जवान चौफेर तैनात ठेवले जातात.
- त्यानंतर इतर जवान जेवण आटोपतात, आराम करतात. त्यानंतर ते तैनात होतात तर इतर आपली काम उरकतात.
केव्हाही होऊ शकते फायरिंग
जंगलात असताना कधीही फायरिंग होण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रचंड सजग राहावे लागले. काही वेळा माओवादी किंवा नक्षलवादी घात लावून बसले असतात. काही ठिकाणी सुरुंग लावून ठेवले असतात. तेव्हा कायम फायरिंगसाठी तयार राहावे लागते.
सैनिकांना दिले जाते खडतर प्रशिक्षण
कोणत्याही वातावरणात जिवंत राहता यावे यासाठी जवानांना खडतर प्रशिक्षण दिले जाते. जवळ काही खायला नसेल तर जंगलात कसे जिवंत राहायचे हेही शिकवले जाते. जंगलातील प्राण्यांचे आवाज, त्यांची वागणूक यावरुन शत्रुपक्षाची चाल कशी ओळखायची हेही सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले भारतीय जवानांचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...