आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी सेक्टरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न, पाकच्या ‘बॅट’चे 2 कमांडो ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) प्रयत्न लष्कराने शुक्रवारी उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत पाकच्या बॅटचे दोन कमांडो ठार झाले आहेत.
 
बॅटने प्रत्यक्ष ताबा रेषेवर आजपर्यंत नेहमीच अतिरेक्यांना घुसखोरीसाठी मदत केली आहे. आता हे जवान स्वत:ही घुसखोरी करत आहेत. या हल्ल्याला आम्ही प्रभावीपणे उत्तर दिले, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. ठार झालेल्या दोन घुसखोरांचे मृतदेह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ‘नो मॅन्स लँड’मध्ये पडून आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

दहशतवाद्यांचे पाठीराखे ‘बॅट’
ताबा रेषेवर पूंछ सेक्टरमध्ये १ मे रोजी बॅटने बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला करून दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता. अतिरेक्यांना घुसखोरीसाठी बॅटने नेहमी मदत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...