आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट: BSF जवानाने रद्द केली मंजूर सुटी, म्हणाला- पाकला धडा शिकवूनच जाईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर/फारूवाल (फिरोजपूर)- बीएसएफचे कॉन्स्टेबल एस बोहरा. बीएसएफ हेडक्वार्टरने मागील आठवड्यात त्यांची सुट्टी मंजूर केली होती. एक महिन्यासाठी ते घरी जाणार होते. रेल्वेचे तिकिटही कन्फर्म झाले होते. पण, या दरम्यान, उरी येथील लष्कराच्या तळावर चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 18 जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर भारत-पाक सीमेवर पुन्हा तनाव निर्माण झाला. बीएसएफने जवानांना हायअलर्ट केले. बॉर्डरवरील परिस्थिती लक्षात घेता बोहरा यांनी मंजूर झालेली सुट्टी रद्द केली आहे. आता पाकला चांगला धडा शिकवूनच सुट्टीवर जाईल, असेही बोहरा यांनी म्हटले आहे.

वाचा, बीएसएफचे जवान आणि बॉर्डरवरील दोन कुटुंबियांची करुण कहाणी सांगणारा 'भास्कर'चा खास रिपोर्ट...
- सुट्टी मंजूर झाल्यानंतर बोहरा यांनी ती का रद्द केली? अधिकार्‍यांनी बोहरा यांना कारण विचारले. त्यावर बोहरा म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पाकच्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी भारतात घुसून हल्ले करत आहे. लष्कराच्या तळावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी पठाणकोट येथे एअरफोर्सच्या बेसवर हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर संधी मिळाल्यास पाकिस्तानला धडा शिकवून सुट्टी साजरी करेल, असे बोहरा यांनी सांगितले आहे.
- 'टीम भास्कर'ने रविवारी पश्चिम ‍सीमेवरील जवानांशी संवाद साधला. सीमेवरील प्रत्येक जवानामध्ये बोहरा यांच्यासारखाच आत्मविश्वास दिसून आला. अनेक जवानांनी मंजूर झालेली सुट्टी स्वत:हून रद्द केली आहे.

महिला जवान म्हणाल्या, शत्रू चुकूनही भारतीय हद्दीत वाला तर जिवंत परतणार नाही....
- झूंझुनूमधील नवलगड येथील बबीता खेदड आणि प्रियांका, दौसा येथील अनिता मिना त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील खंडवा येथील सीमा मागील चार वर्षांपासून बीएसएफमध्ये कार्यरत आहेत.
- लष्करात रुजू झाल्यानंतर पहिल्यादा भारत-पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दररोज महिला जवानांना त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत.
- सीमेवर तणाव आहे. सुट्‍टी घेऊन घरी ये किंवा सीमेवरील ड्यूटी करायची नाही, असे सांगून ऑफिसातले काम माग, असे सांगितले जात आहे. पण सीमेवर ड्यूटी करत असलेल्या चारही महिला जवानांनी घरच्यांना स्पष्ट नकार दिला आहे.
- चौघी दररोज शस्त्र घेऊन तारबंदीवर जातात आणि पाकिस्तानच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवतात.

पुढील स्लाइडवर वाचा, पंजाबमधील ही दोन घरे सीमेवर, पण थोडेही घाबरत नाही...
बातम्या आणखी आहेत...