आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरच्या पुरात वाहून गेले सरहद्दीवरील काटेरी कुंपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये महापुराने केवळ नागरी वस्त्यांच नव्हे तर सरहद्दीवरील काटेरी कुंपणालाही फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच ताबा रेषेवरील एक किलो मीटरपर्यंतचे कुंपण वाहून गेले आहे.

जवानांनी आपल्या पातळीवर त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. परंतु हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलासही पाचारण करण्यात आले आहे. कुंपणाचे काम होईपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जेणेकरून घुसखोरी होणार नाही. जम्मू-काश्मीरमधील अनेक नद्या-नाले पाकिस्तानकडे वाहतात. कठुआच्या हिरानगर भागात वसंतर नाल्यातील कुंपणाचे पुरामुळे जास्त नुकसान झाले आहे. रामगड सेक्टरमध्ये पाणीच पाणी झाल्याने त्यात सीमा सुरक्षा दलाचे अनेक बंकरही वाहून गेले.