आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Citizens Taking More Interest In Searching About ISIS

ISIS बाबत भारतीयांची उत्सुकता वाढली; आसाम आघाडीवर, मुंबई पाचव्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी  फोटो सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिसणारे तरुण हे तामिळनाडूचे असल्याचे सांगण्यात आले. हे तरुण ISIS चे टीशर्ट परिधान करून समर्थन देत आहेत. - Divya Marathi
काही दिवसांपूर्वी फोटो सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिसणारे तरुण हे तामिळनाडूचे असल्याचे सांगण्यात आले. हे तरुण ISIS चे टीशर्ट परिधान करून समर्थन देत आहेत.
गुवाहाटी - असाममध्ये वाढलेल्या जिहादी कारवायांमुळे पोलिसांना याठिकाणी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS पाय पसरण्याची भिती आहे. पोलिस महासंचालक खगन शर्मा यांनी स्वतः अशा प्रकारची भिती व्यक्त केली आहे.

मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत शर्मा म्हणाले की, आतापर्यंत आसाममधील कोणीही ISIS जॉइन केलेले नाही. पण लोकांचा या संघटनेबाबत रस दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलिच चिंताग्रस्त आणि अलर्ट आहेत. शर्मा म्हणाले की, अनेक लोकांनी ISIS ची बेवसाईट सर्फ केली आहे. रेकॉर्ड्सनुसार या वेबसाइटवर आलेल्या हिट्स पाहता लोकांना जरा जास्तच रस असल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार जम्मू काश्मीर आणि आंध्रप्रदेशमध्येही आढळून आला आहे.

सायबर सेल करत आहे मॉनिटर
महासंचालक शर्मा यांच्या मते अासाम पोलिसांच्या क्रिमिनल इनव्हेस्टीगेशन डिपार्टमेंट (सीआईडी) चा सायबर सेल डिपार्टमेंट अशा प्रकरणांवर काम करत आहे. डीजीपी शर्मा म्हणाले की, आमच्याकडे अशा प्रकारच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनही या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

हिंदू आणि मुस्लीम कट्टरपंथी शक्तींचा धोका : डीजीपी
डीजीपी हेदेखिल म्हणाले की, राज्याला हिंदु आणि मुस्लिम असा दोन्ही प्रकारच्या कट्टरतावाद्यांकडून दोका आहे. राज्यात इस्लामिक तत्वांच्या अॅक्टिव्हीटी दिसत आहेत. पण सध्या हिंदु ग्रुप फारसे सक्रिय नाहीत. डीजीपी शर्मा यांच्या मते त्यांनी, बांगलादेशी दहशतवादी संघटना जमातुल मुजाहिदीन बांग्लादेश (जेएमबी) च्या 24 सदस्यांना अटक केली आहे. बांगलादेश सरकारकडून या संघटनेच्या विरोधात पाऊले उचलण्याऐवजी या संघटनेचे सदस्य आसाम आणि भारताच्या काही इतर राज्यांमध्ये पसरले आहेत. यापूर्वी आम्ही हुजीच्या दहशतवाद्यांनाही अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात वाढतेय उत्सुकता
ISIS या दहशतवादी संघटनेचा भारतातील तरुणांवर फारसा परिणाम नसल्याचा दावा मोदी सरकार करत आहे. मात्र एका सर्वेक्षणात मात्र त्याउलट चित्र समोर आले आहे. तरुण या संघटनेच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर संघटनेच्या सोशल मीडिया अॅक्टीव्हीटीजवरही लक्ष ठेवले जात आहे. ISIS च्या कंटेंटसाठी राज्यांमध्ये सर्वाधिक सर्च जम्मू काश्मीरच्या श्रीनगर शहरातून केले जात आहे. तर मुंबई या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

ISIS शी संबंधित कटेंट सर्फ करणाऱ्यांची यादी
सर्वाधिक सर्च करणारी राज्ये
1 जम्मू-काश्मीर
2 अासाम
3 युपी
4 महाराष्ट्र
5 पश्चिम बंगाल

टॉप शहरे
1 श्रीनगर
2 गुवाहाटी
3 चिंचवड
4 हावडा
5 मुंबई
6 उन्नाव

>भारतात ISIS शी संबंधित कंटेंट सर्फ करणाऱ्या पाच शहरांमध्ये केवळ मुंबई हे एकमेव महानगर आहे.
>ISIS शी संबंधित कंटेंट केवळ पुरुष आणि महिलांबरोबरच एज्युकेशनल आणि सोशल बॅकग्राऊंड असलेल्या नागरिकांनाही आकर्षित करत आहे.
>साऊथ एशियामध्ये ISIS शी संबंधित कंटेंट दाखवण्यासाठी सर्वाधिक सर्च पाकिस्तानातून केले जात आह.