आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे ट्रॅकवर काम करत होता हा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोडपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी निधी सोबत क्रिकेटर कर्ण शर्मा - Divya Marathi
पत्नी निधी सोबत क्रिकेटर कर्ण शर्मा
मेरठ- क्रिकेटर कर्ण शर्माच्या घरी 11 ऑक्टोबरच्या रात्री तोडफोड करण्यात आली. यावेळी फायरिंग देखील करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, यावेळी कर्ण घरी नव्हता. तो विशाखापट्टनम येथे सराव करत होता. पोलीसांनी या प्रकरणात तडजोड घडवून आणली आहे. 

आयपीएल सीजन 10 मध्ये कर्णला मुंबई इंडियन्सने 3.2 कोटी रूपयांत खरेदी केले होते. यामुळे कर्ण करोडपती झाला. परंतु, एक वेळी अशी होती जेव्हा कर्ण रेल्वेचा ट्रॅक ठिक करण्याचे काम करत होता. divyamarathi.com शी बोलताना कर्णचे कोच  अतहर अली यांनी त्याचा स्ट्रगल शेअर केला.

एका झटक्यात बनला करोडपती, स्वत:ला बसला नाही विश्वास
- कोचने सांगितले, कर्ण लाहनपाणापासून क्रिक्रेटचे वेड होते. शरिरयष्टी पाहून मैदानावर मित्र त्याला ढोलू म्हणत होते, त्याने त्याकडे कधी लक्ष दिले नाही. तो केवळ आपल्या गेमवर फोकस करत होता.
- परिवाराची परिस्थिती पाहून त्याने 2005 मध्ये रेल्वेत फोर्थ ग्रेडची नौकरी केली. त्याल रेल्वेची पटरी नीट करणे आणि लोखंडी रॉड उचलण्याचे काम करावे लागत होते.
- 2014 मध्ये झालेल्या आयपीएल सीजन 7 मध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघासाठी त्याची निवड झाली. तेव्हा त्याचा पगार 17 हजार रूपये होता. हैद्राबाद संघाने त्याला 3075 कोटी रूपयांत विकत घेतले होते. यामुळे कर्ण एका झटक्यात करोडपती बनला.
- परंतु, कर्णला पहिल्यांदा यावर विश्वासच बसला नाही. त्याच्या पत्नीने फोनवरून माहिती दिली तेव्हा त्याला वाटले ती गंमत करत आहे. त्यानंतर त्याने इंटरनेटवर सर्च केले आणि आपला क्रिकेटर मित्र अमित मिश्राकडून कन्फर्म केले. तेव्हा त्याला पटले की एवढी मोठी रक्कम लावून त्याल विकत घेण्यात आले आहे.
- पहिल्यांदा कर्णला 2009 मध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूने 20 लाख परूपयांच्या कॉन्ट्रॅक्ट्वर अपॉइंट केले होते. त्या पैशाने त्याने आपल्या परिवारासाठी एक घर विकत घेतले होते.

असे आहे क्रिकेट करियर...
- कर्णने 2007मध्ये रेल्वे रणजी टीममधून करियरची सुरूवात केली होती. सप्टेंबर 2014 मध्ये इग्लंडविरोद्ध टी-20 समान्यातून त्याने अतंरराष्ट्रीय करियरची सुरूवात केली. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये श्रीलंकाविरूद्ध वन डे आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट खेळण्याची संधी मिळाली.
- राइट आर्म लेग ब्रेक सह आपल्या गुगलीने फलंदाजांना चकमा देण्यात तो माहिर आहे.

आई शिक्षिका, तर वडिलांचा पारंपारिक व्यवसाय...
-कर्णचे कुटुंब मेरठ जिल्ह्यातील कंकरखेडाच्या युरोपियन कॉलनीत राहते. वडिल विनोद शर्मा कुटुंबाचा पारंपारिक व्यावसाय करतात, तर आई पूनम शिक्षिका आहे.
- कर्णचा विवाह मेरठमध्ये राहणाऱ्या निधीशी झाला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा कर्णचे आणखी खास फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...