आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनॅशनल कोर्टात दुसऱ्यांदा झाली जज भंडारी यांची निवड, सुषमा म्हणाल्या, भारताचा विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिस भंडारी यांना जनरल असेंबलीची 183 आणि सिक्युरिटी काऊंसिलची सर्व 15 मते मिळाली. (फाइल फोटो.) - Divya Marathi
जस्टिस भंडारी यांना जनरल असेंबलीची 183 आणि सिक्युरिटी काऊंसिलची सर्व 15 मते मिळाली. (फाइल फोटो.)

नवी दिल्ली/जोधपूर - जस्टीस दलवीर भंडारी दुसऱ्यांदा हेग येथील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (ICJ) मध्ये निवडले गेले आहेत. दीर्घ निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर ब्रिटीश कॉम्पिटिटर जस्टीस क्रिस्टोफर ग्रीनवूड यांनी माघार घेतली. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री उशीरा 2:25 वाजता जस्टीस भंडारी यांच्या निवडीची घोषणा झाली. या संस्थेत दोन वेळा पोहोचणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यांच्या विरोधात मैदानात असलेले जस्टीस ग्रीनवूड यांनी माघार घेतल्यामुले प्रथमच यूएस, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स (पी-5) चा एकही जज इंटरनॅशनल कोर्टात नसेल. 


सर्व मते मिळाली.. 
- जस्टीस ग्रीनवूड यांनी माघार घेतल्यानंतरही युनायटेड नेशन्समध्ये वोटिंग झाले. त्यात जस्टीस भंडारी यांना जनरल असेंबलीची 183 आणि सिक्युरिटी काऊंसिलची सर्व  15 मते मिळाली. 
- 2012 मध्ये ते ICJ चे जज बनले होते. त्यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. यापूर्वी भारताचे जस्टीस नगेंद्र सिंह ICJ मध्ये दोन वेळा जज बनले होते. 
- भंडारी यांचा हा विजय हे मोठे डिप्लोमॅटिक यश समजले जात आहे. नरेंद्र मोदींनी जस्टीस भंडारींसाठी जोरदार कॅम्पेन केले होते. 
- सुषमा यांनी ट्वीट केले, 'वंदे मातरम्- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये भारताचा विजय झाला आहे. जय हिंद. 


पाकमध्ये कैदेत असलेल्या जाधव यांना फाशीपासून वाचवले 
- जज बनल्यानंतर ICJ मध्ये आतापर्यंत जेवढेही निर्णय झाले आहेत, त्यामध्ये जस्टीस भंडारी यांचे स्पेशल ओपिनियन राहिलेले आहे. 
- त्यांनी सागरी वाद, अंटार्कटिकामधील हत्या, नरसंहाराचे आरोपी, बेटांच्या सीमा, न्युक्लियर डिसार्मामेंट (परमाणू निरस्त्रीकरण), टेरर फाइनांसिंग, व्हॉयलेशन ऑफ युनिव्हर्सल राइट्स सारख्या केसमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. 
- त्याशिवाय पाकिस्तानात कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीयाला फाशीपासून वाचवण्यातही जस्टीस भंडारीची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी 2008 च्या भारत-पाक कराराचा हवाला देत पाकिस्तानने मानवाधिकांचे उल्लंघन केले असे म्हटले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...