आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी ताफ्यात देशी जातीचे श्वान दाखल होणार; सहा ‘मुधोल हाउंड’ श्वानाचे प्रशिक्षण पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरत- लष्कराच्या ताफ्यात प्रथमच देशी जातीचे  श्वान दाखल होणार आहेत. आतापर्यंत जर्मन शेफर्ड, लेब्राडॉर व ग्रेट स्विस माउंटनसारख्या विदेशी श्वानांना भरती करण्यात आले होते. प्रथमच कर्नाटकच्या ‘मुधोल हाउंड’ जातीच्या श्वानांचा समावेश केला जाईल. ६ मुधोल हाउंडना मीरतमध्ये लष्कराच्या रीमाउंट अँड व्हेटर्नरीमध्ये(आरव्हीसी) प्रशिक्षणही दिले आहे. हे श्वान डिसेंबरमध्ये लष्कराच्या ताफ्यात रुजू होतील.

आरव्हीसी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत विदेशी जातीच्या कुत्र्यांनाच प्रशिक्षण दिले होते. देशी श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना स्वतंत्र तयारी करावी लागली. सुरुवातीस  या श्वानांना स्वतंत्र ठेवून वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. मुधोलच्या क्षमतेची चाचणी घेतली.
 
लसीकरणानंतर त्यांना प्राथमिक निर्देश समजून घेण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर मुधाेल हाउंडला विशेष प्रशिक्षणासाठी तयार केले. मुधोल हाउंड जात १९२० मध्ये विकसित केली होती. २००५ मध्ये टपाल खात्याने मुधोल हाउंडचे छायाचित्र असणारे ५ रुपयांचे तिकीट जारी केले होते. मुधोलला आरव्हीसीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्याआधी त्यांच्या शारीरिक क्षमतेचा अभ्यास करण्यात आला.  निकष पूर्ण केलेल्यानंतर त्यांना ट्रेनिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले. तिथे मुधोल श्वानांना विशेषकरून गार्ड डॉग व स्निफर डॉग म्हणून प्रशिक्षण दिले.

कर्नाटक पशुवैद्यकीय विभागाचे महेश डोडमणी यांच्या म्हणण्यानुसार, लेब्राडॉर व जर्मन शेफर्ड जी कामे ९० सेकंदात करतात ते काम मुधोल ४० सेकंदात करण्यात सक्षम आहेत.
 
प्रशिक्षणादरम्यान मुधोलचे कौशल्य पाहून लष्करी अधिकाऱ्यांनी आणखी ८ मुधोल श्वानांची मागणी केली. आरव्हीसीने अन्य देशी जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
मुधोल हाउंड जनुकीयदृष्ट्या बळकट, वेगाने धावतात व अॅक्टिव्ह असतात
मुधोल हाउंड देशी जातीचे श्वान आहे. मात्र, ते अन्य देशी जातीच्या श्वानांपेक्षा जनुकीयदृष्ट्या बरेच बळकट असतात.  सडपातळ परंतु लांब असणाऱ्या या श्वानाचे वजन २८ किलोपर्यंत व लांबी ७२ सेंमीपर्यंत असते. वेगाने पळणारे मुधोल हाउंड मुडी असतात. लवकर न थकणारे हे श्वान वेगवान हल्ला करतात. या वैशिष्ट्यामुळे ते गार्ड डॉगची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावू शकतात.
बातम्या आणखी आहेत...