(फोटो: नवरदेव एलेक्सेस आणि नववधु कनिका)
जालंधर- स्वित्झर्लंडमध्ये अनेक वर्षे राहुन देखील पंजाबमधील रहिवासी कनिका हिने भारतीय संस्कृतीचा कधी विसर पडू दिला नाही. कनिका आणि एलेक्सेस या दोघांनी 2012 मध्ये नोंदणी पद्धतीने
विवाह केला होता. मात्र, कनिकासोबत राहुन एलेक्सेसच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी प्रचंड कुतुहल वाटू लागले. त्यानंतर दोघांनी भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेनुसार पुन्हा एकदा विवाह करण्याच्या निर्णय घेतला.
विशेष म्हणजे कनिकाशी लग्न करण्यासाठी एलेक्सेस यूरोपहून वरात घेऊन आला होता. या विवाह सभारंभाला दोघांचे 70 नातेवाईक उपस्थित आहेत.
न्यू अशोक नगरातील रहिवासी प्रेम शर्मा यांची कन्या कनिका आणि एलेक्सेस या दोघांनी मास्टर तारा सिंह नगरातील छिन्न मस्तिका धाम चिंतपूर्णी मंदिरात पूजन केले. गुरुवारी रात्री हवेली हॅरिटेजमध्ये साखरपुडा (रिंग सेरेमनी) झाला. शनिवार (8 नोव्हेंबर) कनिका आणि एलेक्सेसचा विवाह आहे.
कनिका ही ऑस्ट्रेलियामध्या कस्टम सर्व्हिस मॅनेजर तर एलेक्सेस हा केपीएमजी ऑडिटिंग कंपनीत अकाउंटेंट या पदावर कार्यरत आहे. कनिकाची आई वीना, बहिण मनीषा (ऑस्ट्रेलियाहून), भाऊ विनेश आणि अज्ञानता शर्मा (आयरलंडहून) लग्न समारंभास उपस्थित झाले आहेत. तसेच एलेक्सेसचे वडील लॉरेंट रोमानेंस, आई ईजाबेल यांच्यासह अनेक नातेवाईक भारतात आले आहेत. बंधनात अडकणार आहेत.
सन 2010-11 दरम्यान कनिका आणि एलेक्सेसचे प्रेम जुळले होते. डिसेंबर, 2012 मध्ये दोघांनी कोर्टमॅरेज केले. कनिका म्हणाली, एलेक्ससचे माझ्यावर जिवापाड प्रेम आहे. भारतीय संस्कृतीवरही त्याचे प्रेम आहे. भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याची एलेक्ससची इच्छा होती. यामुळे आम्ही दोघे पुन्हा एकदा भारतात येऊन हिंदू परंपरेनुसार विवाह करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कनिका आणि एलेक्सेसच्या विवाहात आले विदेशी पाहुणे...