आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमधून स्वदेशी परतली ‘भारत की बेटी’, बंदुकीच्या धाकावर झाला होता विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र वाघा सीमेवरील आहे...उज्मा म्हणाली- सीमा ओलांडल्यानंतर भारताची माती छातीला लावली. वाटले मोकळा श्वास घेऊ शकते. स्वातंत्र्याची जाणीव झाली. यामुळे जमिनीचे चुंबन घेतले. - Divya Marathi
हे छायाचित्र वाघा सीमेवरील आहे...उज्मा म्हणाली- सीमा ओलांडल्यानंतर भारताची माती छातीला लावली. वाटले मोकळा श्वास घेऊ शकते. स्वातंत्र्याची जाणीव झाली. यामुळे जमिनीचे चुंबन घेतले.
नवी दिल्ली/ अमृतसर- पाकिस्तानमध्ये कथितरीत्या बंदुकीचा धाक दाखवून एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करण्यासाठी विवश करण्यात आलेली उज्मा अहमद नावाची भारतीय युवा महिला गुरुवारी वाघा सीमेच्या रस्त्याने मायदेशी परतली.
 
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत करताना तिला ‘भारत की बेटी’ संबोधले अाहे. जे तुझ्यावर बेतले, त्यामुळे मला दु:ख झाले आहे, असे ट्विट त्यांनी केले.  नवी दिल्लीची वीस वर्षीय उज्मा हिला इस्लामाबाद हायकोर्टाने बुधवारी भारतात परतण्याची परवानगी दिली होती.
 
२५ दिवस पाकिस्तानात राहिल्यानंतर उज्मा मायदेशी परतली आहे. परतल्यानंतर उज्माने तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला -  
 
आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. पाकिस्तान म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तेथून मी परतले आहे. मी तालिबानच्या भागातील बुनेर येथे अडकले होेते. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी सुषमाजींना धन्यवाद देईन.  मी तर पाकिस्तानात फिरण्यासाठी गेले होेते. १ मे रोजी जाईन आणि १०-१२ रोजी परत येईन, असे वाटले होते. ताहिरने मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून पळवून नेले. माझा छळ केला. मुलीला ठार करण्याची धमकी दिली. त्याच्या घरी बंदुका होत्या. नाइलाजाने मी निकाहनाम्यावर हस्ताक्षर केले. मी अनाथ आहे. पण आज कळले की, भारतीय असणे ही किती अभिमानाची गोष्ट आहे. सुषमाजींनी फोन केला आणि म्हटले - तू  भारताची मुलगी आहेस. आम्ही तुला परत आणू. बुनेरमध्ये आणखी मुली होत्या. तेथे त्यांचा वापर केला जातो. भारतासारखा  दुसरा सुरक्षित देश नाही
- उज्मा अहमद

 
बातम्या आणखी आहेत...