आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्विस बॅंकांमधील भारतीयांचे अकाऊंट डिटेल्स काढण्याच्या कामाला गती, 5 नाव मिळाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विदेशी बॅंकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा उघड करण्याचा कामाला मोदी सरकारने गती दिली आहे. स्वित्झर्लंडला 20 रिक्वेस्ट पाठवून काही भारतीयांच्या अकाऊंटची माहिती मिळवण्यात आली आहे. आतापर्यंत सरकारला पाच बॅंक अकाऊंटची माहिती मिळाली आहे.
या लोकांवर आहे सरकारची नजर
- भारताने ज्या लोकांची माहिती मागवली आहे त्यात शेअर मार्केटमध्ये लिस्टेड तीन कंपन्या आहेत. या शिवाय रिअल इस्टेट कंपनीचा माजी सीईओ, दिल्लीत राहणाऱ्या माजी ब्युरोक्रॅटची पत्नी, दुबईत स्थायिक झालेला इनव्हेस्टमेंट बॅंकर, भारतात पळून गेलेला व्यापारी-त्याची पत्नी आणि युएईच्या एका कंपनीचा समावेश आहे.
- काही गुजराती बिझनेसमनचीही या यादीत नावे आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारतात राहायचे. पण आता विदेशात स्थायिक झाले आहेत.
- संशय आहे, की या लोकांनी पनामा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील कंपन्या लिस्टेड केल्या आणि त्यानंतर स्विस बॅंकमध्ये अकाऊंट ओपन केले.
माहिती शेअर केली जाणार
- भारताने स्वित्झर्लंडकडे अॅडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंटची रिक्वेस्ट केली आहे. यात अकाऊंट होल्डरबाबत माहिती मागविली जाते. स्विस नियमांप्रमाणे, अकाऊंड होल्डरची यासंदर्भात चौकशी केली जाते. त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तर याची माहिती संबंधित देशाला दिली जाते.
- गेल्या आठवड्यात भारत आणि स्वित्झर्लंडने एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे 2018 नंतर दोन्ही देशांमधील अकाऊंटची सविस्तर माहिती शेअर केली जाणार आहे.
- यापूर्वीही स्वित्झर्लंडने काही अकाऊंट होल्डर्सची माहिती भारताला दिली होती. या सुचनांवर टॅक्स डिपार्टमेंट आणि ईडीने कारवाईही केली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, सरकारने आतापर्यंत दिली आहे 20 अकाऊंटची माहिती....
बातम्या आणखी आहेत...