आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Guru Asaram Bapu Arrested Over Rape Claims

बर्‍याच महिलांना एकांतात भेटत होते आसाराम बापू;सेवेकर्‍याचा पोलिसांसमोर जबाब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसारामबापूंचे प्रमुख सेवेकरी शिवा याने पोलिस चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तो म्हणतो की, आसाराम बर्‍याच महिलांना एकांतवासातच भेटत होते. उत्तर प्रदेशातील शहजहांपुरातील शिष्य, त्यांची मुलगी जोधपूरला येणार असल्याची माहिती फक्त आसाराम यांनाच होती. या मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत, तिला तेथे बोलावून घेण्यात आले होते. शिवा याच्या माध्यमातूनच अनेक मुख्यमंत्री, आयएएस, आयपीएस अधिकारी, न्यायाधीश आसाराम यांच्याशी मोबाइलवरून बोलायचे. शिवाच्या चौकशीत इतर अनेक बाबींचा उलगडा होईल. त्यामुळे पोलिस पुन्हा आसारामबापूंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतील.