आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Home Minister Rajanath Sinha See Border Security

सरहद्दीच्या संरक्षणावर विश्वास, सीमाविस्तारावर नाही : राजनाथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- भारताचा सरहद्द संरक्षणावर विश्वास आहे; परंतु सीमाविस्तारावर नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. त्याचबरोबर शेजारी देशांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी घुसखोरी, सीमेवरील दहशतवाद बंद झाला पाहिजे. चर्चेतूनच या सर्व समस्यांवर उत्तर शोधता येऊ शकेल. चीन, पाकिस्तानसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असून आशिया खंडात शांतता व विकास नांदावा, असे वाटते.
पाकिस्तान आणि चीनसोबत भारताला चांगले संबंध हवे आहेत. परंतु दोन्ही देशांनी आधी सीमारेषा, घुसखोरी आणि युद्धबंदीचे उल्लंघन इत्यादी समस्या सोडवाव्यात, तरच हे संबंध चांगले बनतील, असा इशारा भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. सिंह सध्या पाकिस्तान आणि चीन सीमेलगतच्या काश्मिरातील भागांच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी सांबामध्ये इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या नवीन ऑफिसर्स मेसचे उद्घाटन केले त्या वेळी ते बोलत होते. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, सीमारेषेबाबत चीनशी असलेला वाद सोडवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र, चीनने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जोपर्यंत या वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत दोन्ही देशांच्या संबंधात माधुर्य येणार नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते आणि दूरसंचार जोडणीचा मुद्दा कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. या भागांतील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत व्हावी यासाठी आम्ही रस्ते बांधत आहोत. आम्ही विस्तारवादी नसून आमच्या सीमारेषेचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नरत आहोत.

पाकने दहशतवाद, घुसखोरी थांबवावी
गृहमंत्र्यांनी या वेळी पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या युद्धबंदी उल्लंघनाच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. सीमारेषेपलीकडून होत असलेली घुसखोरी आणि दहशतवाद पाकिस्तानाने थांबवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी पाकला या वेळी दम दिला. चीन, पाक आणि भारताचे चांगले संबंध आशिया खंडाचा विकास आणि शांततेसाठी महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

"हिमालयपुत्र' आहेत आयटीबीटी जवान
गृहमंत्र्यांनी इंडो-तिबेटियन जवानांवर या वेळी स्तुतिसुमने उधळली. देशाच्या ३२८८ किमीच्या सीमारेषेवर तैनात जवानांसाठी हे कार्य हे खूप कठीण आहे. मात्र, जवानांनी हा खडतर मार्ग आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर टिकवून ठेवला आहे. जवान फक्त "हिमवीर'च नव्हे तर "हिमालयपुत्र'ही आहेत. जवानांच्या या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशी भावना सिंह यांनी व्यक्त केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारत-पाकमध्ये फ्लॅग मीटिंग