आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Leaders Died In Accident Top Indian Leader

हेमा मालिनी एवढे लकी ठरले नाही हे दिग्गज नेते, रस्ते-विमान अपघातात झाला मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - गेल्या गुरुवारच्या रात्री अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांची मर्सिडीज कार राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील टी-पॉइंटवर अल्टो कारला धडकली आणि अपघात झाला. यात हेमा मालिनी जखमी झाल्या, तर एका दीड वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा हेमा यांनी सिटबेल्ट लावलेला नव्हता अशी माहिती आहे. त्यांची कार अतिशय वेगात असल्याचेही सांगितले जात आहे. याआधीही देशात अनेक दिग्गज नेत्यांसोबत रस्ते अपघात आणि विमान दर्घटना घडल्या आहेत, मात्र ते हेमा मालिनी एवढे लकी ठरले नाही. divyamarathi.com आज या पॅकेजमधून देशातील अशाच नेत्यांबद्दल माहिती देत आहे, ज्यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला.
नेत्यांच्या दुर्दैवी अपघाताची चर्चा करायची झाल्यास महाराष्ट्रात सर्वप्रथम नाव येते ते भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार प्रथमच सत्तेत आले आणि केंद्रीय ग्रामीणविकास मंत्रीपदाची शपथ घेऊन मुंबईला परतण्यासाठी निघाले असताना दिल्लीतच मुंडेच्या कारला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. मुंडेंच्या सत्कारासाठीचा सोहळा शोक सभेत बदलला होता.

अपघातातमध्ये नेत्यांच्या मृत्यूचा हा सिलसिला सुरु झाला 30 मे 1973 मध्ये. एका विमान दुर्घटनेत तत्कालिन लोह आणि खनिज मंत्री मोहन कुमारमंगलम यांचे निधन झाले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे पूत्र खासदार संजय गांधी यांचा 23 जून 1980 ला दिल्लीत एका विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल अनेक प्रकारचे कयास आणि संशय व्यक्त करण्यात आले. भारतीय राजकारणात नव्या दमाने पुढे येत असलेले माधवराव सिंधिया, राजेश पायलट आणि महाराष्ट्रातील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील अपघातात मृत्यू झाला. मध्यप्रदेशचे मंत्री लक्ष्मणसिंह गौण यांचाही अपघातात मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील सतई राम यादव यांची कार रेल्वेक्रॉसिंगवर कापली गेली होती. छत्तीसगडचे अन्नपुरवठा मंत्री पुन्नूलाल मोहल यांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पूर्ण बातमी...