रांची- बिहारमधील बेतिया शहर एक अनोखी घटना घडली. ती म्हणजे, बेतिया येथील रहिवासी उदेश महतो यांचे माकड रामू आणि माकडीन रामदुलारीचा शाही
विवाह सोमवारी संपन्न झाला. रामू आणि रामदुलारीची फुलांनी सजवलेल्या मारुती जिप्सीतून वरात काढण्यात आली. विवाहाला बेतिया शहरातील जवळपास 200 लोक सहभागी झाले होते.
बेतिया येथील तीन लालटेन चौकात राहणारे उदेश महतो हे कुली आहेत. रामू हा सात वर्षांचा असून उदेश यांना तो नेपाळमध्ये सापडला होता. महतो यांनी गेल्या वर्षी एक माकडीनला खरेदी केले. तिचे नाव रामदुलारी ठेवले. सुरुवातीला रामू आणि रामदुलारी यांचे अजीबात जमत नव्हते. दोघे नेहमी भांडत असत मात्र, काही दिवसांतच दोघांमध्ये गट्टी जमली. दोघे एकमेकांची काळजी घेऊ लागले. त्यानंतर दोघांचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे उदेश महतो यांनी सांगितले.
उदेश महतो यांनी पंडित सुनील शास्त्री यांची भेट घेऊन विवाहाचा हिंदु रितीरिवाजाप्रमाणे मुहूर्त निश्चित केला. उल्लेखनिय म्हणजे निमंत्रण पत्रिकाही छापल्या. मंडप, बॅंडपासून प्रीतिभोजपर्यंत तयारी करण्यात आली होती. प्राणीव प्राण्याचा विवाह लावून देण्याचा पहिलाच अनुभव असल्याचे सुनील शास्त्री यांनी सांगितले.
रामू आणि रामदुलारी यांच्या विवाहाचा मुहूर्त सोमवार सकाळी 11 वाजेचा होता. गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान करून रामदुलारीला सजवण्यात आले तर गडद पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करून रामूला तयार करण्यात आले. रामदुलारीचे कन्यादान उदेश महतो यांची पत्नी मीना देवी करणार होत्या. मात्र, आदल्या दिवशी रामदुलारीने मीना देवीला चावा घेतला होता. त्यामुळे रामदुलारीचे कन्यादान उदेश मेहता यांनी केले.
रविवारी सायंकाळी फुलांनी सजवण्यात आलेल्या मारुती जिप्सीच्या टपावर रामू-रामदुलारीला बसवण्यात आले आणि भव्य वरात काढण्यात आली. वरातीत शहरातील लोक सहभागी झाले होते. रामू- रामदुलारीचा विवाह झाल्यानंतर उपस्थित पाहूण्यांनी भोजनचाही आस्वाद घेतला. 200 जणांना रामू आणि रामदुलारीच्या विवाहाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते.
रामू आणि रामदुलारीच्या शाही विवाहाचे छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. उदेश महतो यांचा चार मुले आहेत. उदेश रामूला
आपला थोरला मुलगा समजतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, रामू आणि रामदुलारीच्या शाही विवाहाचे फोटो...