आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Mars Mission News In Marathi, Divya Marathi, Isro

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत ठरला पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील पहिला देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - इंडियन स्‍पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणझेच इस्रोसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. इस्रोने पाठवलेले यान सुमारे 65 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थिपित झाले. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
जगातील कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळावर यान पाठवण्यात यश मिळालेले नव्हते. अमेरिकेचे पहिले 6 प्रयत्न अपयशी ठरले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बेगळुरूच्या मार्स मिशन कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते. मिशन यशस्वी होताच मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. शास्त्रांनीही यानाशी संपर्क होताच जल्लोष केला. या मोहीमेत मोठे यश हाती आले असून पुढचे काही तास या मोहीमेच्या दृष्टीने आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत.
नऊ महिन्याच्या प्रदीर्घ प्रवासांत कठीण वाटणारे सर्व टप्पे सहज पार करून मंगळाच्या गुरुत्व बल परीघात दाखल झालेले भारतीय मंगळयान बुधवारी सकाळी मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले. सकाळी 7:17:32 वाजता यानावरील इंजिन सुरू करण्यात आले, असून शास्त्रज्ञांना त्याची माहितीही मिळाली आहे.
दुपारी बारावाजेनंतर या यानातील कॅमेरा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास मंगळावरील छायाचित्र मिळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यानातील विविध यंत्रे त्यांच्या पद्धतीने काम सुरू करणार असून माहिती मिळण्यास काही कालावधी लागणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मंगळाच्या कक्षेत असे दाखल झाले यान
मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होण्याच्या तीन तासांपूर्वी अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमधून यान गेले. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकांनी सर्व कमांड 14 आणि 15 सप्टेंबरलाच कम्प्युटरमध्ये अपलोड केल्या होत्या. यासंदर्भातील आणखी प्रक्रिया आणि त्यांची वेळ जाणून घेऊयात...
4:17:32
यानात लावलेला शक्‍त‍िशाली कम्‍युनिकेशन अँटिना सुरू झाला.

6:56:32
स्‍पेसक्राफ्टमध्ये फॉरवर्ड रोटेशन सुरू.

7:12:19
स्‍पेसक्राफ्टचा मंगळाच्या छायेत प्रवेश. म्हणजेच मंगळग्रहाचे यान आणि पृथ्‍वी यांच्यामध्ये आंशिक तत्वावर.

7:14: 32
यानाच उंची नियंत्रित करण्यासाठी थ्रस्टर्स फायर करण्यात आले.

7:17:32
मेन इंजीन सुरू.

7:21:50
मंगळाच्या मध्ये आल्यामुळे स्पेसक्राफ्ट दिसणे बंद. सोबतच सिग्नल मिळणेही बंद.

7:22:32
यानाचे कम्‍युनिकेशन सिस्‍टीम पूर्णपणे बंद.

7:30:02
इंजीन सुरू झाल्याचे स्पष्ट. पृथ्‍वीवर सुमारे 12 मिनटांनंतर मिळाली माहिती.

7:37:01
यान मंगळ ग्रहाच्या छायेबाहेर निघाले.

7:41:46
इंजिन बंद झाले. (सुमारे 249.5 किलो इंधन जळाल्यानंतर)

7:45:10
सर्व प्रक्रिया पूर्ण होतील.

7:47:46
यानाशी पुन्हा संपर्क झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा शास्त्रज्ञांना जल्लोष व शेवटच्या स्लाइडवर पाहा VIDEO