बंगळुरू - दहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटी किलोमीटर अंतर कापून मंगळयान बुधवारी सकाळी मंगळावर पोहोचले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सकाळी सव्वासात वाजता यानाचे इंजिन चालू केले. वेग कमी केला व २४ मिनिटांनंतर यान मंगळ कक्षेत धडकले. या वेळी पंतप्रधान
नरेंद्र मोदी इस्रोच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होते. ‘आज मंगळाला मॉम मिळाली. मॉम कधीच निराश करत नाही. त्यामुळे यशाची खात्री होती’, असे मोदी म्हणाले. या मोहिमेचे नाव ‘मार्स ऑब्रिटर मिशन’ म्हणजेच ‘मॉम’ आहे. यानाने पोहोचल्यावर दोन तासांत छायाचित्रे पाठवून दिली.
मंगळयानाने मारल्या क्युरिऑसिटीशी गप्पा
मंगळयान : ‘हॅलो क्युरिऑसिटी. दिवस कसा आहे? मी तुझ्या आसपासच राहीन.’
क्युरिऑसिटी : ‘नमस्कार मार्स ऑर्बिटर. स्वागत आहे. इस्रोचे अभिनंदन.’
मंगळयान : ‘हे लाल दिसते तो मंगळ ग्रह आहे. नाश्त्यानंतर मी परत येतो. येथे ऊन चांगले आहे. ते बॅटरींसाठी उपयुक्त आहे.’
((इस्रोने ‘मॉम’ नावाने टि्वटर हँडल सुरू केले आहे. दोन तासांत त्याला २२ हजार फॉलोअर्स मिळाले.)