आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Mars Program News In Marathi, Divya Marathi

मंगळावरील भारतीय पाऊल ३३ दिवस दूर, ९० लाख किमी अंतराचा शेवटचा टप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम आता या ग्रहापासून अवघ्या ९० लाख किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करण्यासाठी भारतीय अवकाश यानाला अवघे ३३ दिवस लागतील. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ही मािहती िदली.
गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला श्रीहरिकोटाहून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाने मंगळाच्या िदशेने झेप घेतली होती. ४५० कोटी रुपयांच्या या मोहिमेत नियोिजत वेळेनुसार हे अवकाश यान २४ सप्टेंबरपर्यंत मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होणार आहे. या मंगळ मोहिमेत यानाच्या दिशेमध्ये काही बदल केला जाण्याची शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी फेटाळली.

... तर भारत टॉप फोरमध्ये
मंगळावर स्वारी करण्यात भारतीय यानाला यश आले तर मंगळावर अप्रत्यक्ष पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरेल. यापूर्वी युरोपीय अवकाश संस्था, अमेरिकेची नासा, रशियाची रोस्कास्मोस या अवकाश संस्थांनी मंगळावर किंवा या लाल ग्रहाच्या कक्षेत यान पाठवण्यात यश मिळवले आहे. शेवटच्या टप्प्यात आता इस्रोसमोर यानाच्या मंगळाच्या कक्षेतील प्रवेशाचे मोठे आव्हान आहे. या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणानुसार यानाची गती नियंित्रत करणे आणि मग सुव्यवस्थित प्रवेश करणे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.