आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Moon Program News In Marathi, Divya Marathi, Isro

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळ मोहीमासाठी इस्रो सज्ज,२४ सप्टेंबरला यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत करणार प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारतीय मंगळयान ईप्सित लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार येत्या २४ सप्टेंबरला हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करेल आणि नवा इतिहास घडेल. यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ सज्ज असून शेवटच्या टप्प्यात यानाचे द्रवरूप इंधन असलेले इंजिन सुरू करणे हे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. यासाठी चाचणी घेतली जात आहे. याला पर्याय म्हणून यानावर आग्निबाणही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मंगळयान सोमवारी मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार आहे. मात्र, मंगळाच्या वातावरणात प्रवेश करताना त्याला अधिक शक्तीचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी गेल्या तीनशे दिवसांपासून निद्रिस्त असलेल्या इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे . या चाचणीदरम्यान ते फक्त चार सेकंदच सुरू होईल, यासंबंधीच्या डिजिटल कमांडस् यानाच्या यंत्रणेत नोंदवलेल्या असून यानाच्या यंत्रणेतील हालचालींचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू आहे.
यशाच्या क्षीतिजावर : गेल्या ५ नोव्हेंबरला पीएसएलव्हीने उड्डाण घेतल्यानंतर भारतीय यान मंगळाच्या दिशेने रवाना झाले. या प्रवासात १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीची कक्षा ओलांडताना यानावर असलेले द्रवरूप इंधन असलेले इंजिन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ते निद्रिस्त आहे.

पर्यायी व्यवस्थाही तयार
यदाकदाचित मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होताना द्रवरूप इंधन असलेल्या इंजिनात काही बिघाड झालाच तर पुढे काय? यावर भारतीय शास्त्रज्ञांनी उपाय शोधून ठेवला आहे. यासाठी जास्तीत जास्त वेळ ऊर्जा देऊ शकतील असे आठ अग्निबाण यानावर सज्ज आहेत. एकाच वेळी ते सुरू केले तर ही शक्ती यानाला मंगळाच्या कक्षेत नेण्यास पुरेशी आहे.

... तर इस्रो चौथी संस्था
४५० कोटींचा हा प्रकल्प यशस्वी ठरला तर मंगळ मोहीम यशस्वी पूर्ण करणारी "इस्रो' जगातील चौथी अवकाश संस्था ठरेल. यापूर्वी युरोपियन अवकाश संस्था, नासा आणि रशियाची रॉस्कोसमॉस या संस्थांनी मंगळ ग्रहापर्यंत धडक मारलेली आहे. मंगळ ग्रहासाठी आतापर्यंत जगभरात आखण्यात आलेल्या ५१ पैकी २४ मोहिमाच यशस्वी ठरल्या आहेत. यात भारत आशियातील पहिला देश आहे.