आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian National Trapped In Iraq, Najaf, Divya Marathi, Amenesty International

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : 40 नव्हे आणखी 300 भारतीयांना इराकमध्ये बनवले बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर । इराकमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या तावडीतून थोडक्यात बचावल्याने छावनी कलागावातील परमिंदर देवाचे आभार मानत आहेत. ते इराकमध्ये तेहराक नूर अल हुदा नावाच्या कन्सट्रक्शन कंपनीत काम करतात. सुटीवर भारतात आल्यानंतर काही कारणास्तव त्यांना परत जाता आले नाही. त्यामुळे या संकटातून ते बचावले मात्र, त्यांचा भाऊ कमलजीत अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. तसेच याच गावातील सुखविंदर उर्फ जस्सी हेहे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत.
इराकमध्ये काम करणा-या 17 हजार भारतीयांपैकी बहुतांश पंजाबचे आहेत. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अनेक शहरांवर ताबा घेतल्याने या सर्वांच्या कुटुंबीयांना चिंतांनी घेरले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता सुखविंदर याने नातेवाईकांना फोन केला. त्याचा आवाज व्यवस्थितपणे येत नव्हता मात्र त्याच्याबरोबर एका कंपनीत काम करणा-या 300 भारतीयांना दहशतवाद्यांनी बंदी बनवल्याचे त्यांनी सांगितले. या 300 भारतीयांपैकी 200 पंजाबमधील आहेत. कंपनीचे अधिकारी मात्र कर्मचा-यांना दहशतवाद्यांच्या तावडीत सोडून पळून गेले आहेत.
सुखविंदरचा फोन एका मिनिटातच कट झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत त्याच्याशी संपर्क झाला नाही. मात्र त्याने व्हॉट्स अफच्या मदतीने बंदी असलेल्या सर्व भारतीयांचा एक फोटो पाठवला आहे. त्यामुळे सुखविंदरची आई आणि त्याचे संपूर्ण कुटुंब चिंतीत आहे. दुसरे एक बंदी कमलजीत यांनी 15 जूनला फोन केला होता. त्यांना कुठल्या तरी अज्ञात स्थळी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले होते.

फोटो - बंदी असणा-या भारतीयांचा हा फोटो बगदादमधून सुखविंदर यांनी व्हाट्स अपच्या मदतीने पाठवला आहे.
पुढे वाचा - ISIS च्या दहशतवाद्यांचा आणखी एका शहरावर ताबा