आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत तटरक्षक दलाचे विमान बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तटरक्षक दलाचे एक गस्तीवर असलेले विमान सोमवारी रात्री उशिरा बेपत्ता झाले आहे. या विमानात असलेल्या चालक दलाच्या तीन सदस्यांशी मंगळवारी सायंकाळपर्यंत संपर्क होऊ शकला नव्हता.

सीजी-७९१ या विमानाचा रात्री ९.२३ वाजता संपर्क तुटला. चेन्नई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास या विमानाने चेन्नई येथून उड्डाण केले. चेन्नईपासून दक्षिणेकडे ९५ नॉटिकल मैल अंतरावर विमान असताना संपर्क तुटला. भारतीय नौदल व तटरक्षक दलाने विमान शोधमोहीम सुरू केली आहे. ४ नौदलाची व ५ तटरक्षक दलाची जहाजे या शोधमोहिमेसाठी धाडण्यात आली आहेत. पी ८-१ विमानही शोधमोहिमेवर पाठविण्यात आले आहे. या विमानातील सर्व क्रू सदस्य अनुभवी कर्मचारी आहेत. तिरुचिरापल्ली विमानतळाशी या विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता.
या विमानात डेप्युटी कमांडंट वैमानिक विद्यासागर, सहवैमानिक एम. के. सोनी आणि
सुभाष सुरेश होते.

१० हजार फूट क्षमता
या विमानाची जास्तीत जास्त १० हजार फूट उंचीवर उडण्याची क्षमता होती. शिवाय या विमानातील चालक दलाचे सर्व सदस्यही प्रशिक्षित होते. सोबत जीवनरक्षक पॅराशूट आणि इतर उपकरणेही होती. मात्र, कमी उंचीवर उडणाऱ्या अशा विमानांत आपत्कालीन स्थितीत या जीवरक्षक साहित्याचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा लागतो.
बातम्या आणखी आहेत...