आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक तुरुंगात भारतीय कैद्यांवर शारीरिक, मानसिक अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पाकिस्तानच्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगामध्ये कैदेत असणा-या भारतीय कैद्यांवर शारीरिक व मानसिक अत्याचार होत आहेत. त्या ठिकाणाहून काही कैद्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे हा खुलासा झाला आहे. कैद्यांनी या पत्रात लिहिले आहे की, आम्ही या ठिकाणी नरक यातना भोगत आहोत. रोज-रोज मरण्याऐवजी आम्हाला एकदाच मारून टाका.


हे पत्र अतिशय गुप्त पद्धतीने भारताच्या मानवाधिकार आयोगाला पाठवण्यात आले आहे. पत्रकावर 11 भारतीय कैद्यांच्या सह्या आहेत. त्याची एक प्रत ‘दिव्य मराठी’ नेटवर्कलाही मिळाली आहे. 27 जुलै 2013 रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. पत्रावर आणखी 17 कैदी सह्या करणार होते. पण त्यांच्यामध्ये सही करण्याएवढेही त्राण उरले नव्हते, असे पत्रात म्हटले आहे.


पत्रात लिहिलेला मजकूर
आम्हाला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. अनेक कैद्यांची शिक्षा पूर्ण होऊनही त्यांना मुक्त केलेले नाही. आजारी कैद्यांना उपचार पुरवले जात नाहीत. भारत-पाकिस्तानच्या संयुक्त न्यायिक समितीने तीन वेळा तुरुंगाचा दौरा केला, पण तो फक्त दिखाव्यासाठी होता. प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. ते फक्त आले व फिरून परत गेले. समितीच्या दौ-यानंतर आमच्या त्रासात अधिक वाढ झाली, असे कैद्यांनी पत्रात लिहिले आहे. या समितीने 13 जून 2008, 22 एप्रिल 2011 आणि 30 एप्रिल 2013 रोजी तुरुंगाचा दौरा केला होता.