आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्रीमियम तत्काळ\'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; 2300चे तिकीट 7200 रुपयांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ/रांची/ग्वाल्हेर/इंदूर/रायपूर/जयपूर/भोपाळ- शाळांच्या उन्हाळी सुट्या व सुरु झालेली लग्नसराईमुळे रेल्वे गाड्यामध्ये तोबा गर्दी आहे. रिझर्व्हेशन मिळत नसल्याने प्रवाशांना जनरल कोचमधून कसाबसा प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची प्रचंड गैरसोय तर होते आहेच यासोबतच त्यांची आर्थिक लूटही होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

'प्रीमियम तत्काळ' तिकीटाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची अक्षरश: फसवणूक होताना दिसत आहे. प्रवाशांकडून अॅक्चुअल तिकिट भाड्यापेक्षा तीन ते पाच पट जास्त भाडे मोजावे लागत आहे. जिथे स्लीपर क्लासच्या तिकीटासाठी 265 रुपये लागतात, तिथे प्रीमियम तत्काळच्या नावाखाली प्रवाशांकडून 1000 रुपये आकारले जात आहे.

भोपाळ एक्सप्रेसमध्ये 1500 चे एसी तिकिट 4500 रुपये व पुष्पक एक्सप्रेसमध्ये 2300 च्या तिकिटासाठी 7200 रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे. अनेक एक्सप्रेसचे प्रीमियम तत्काळ तिकीटाचे दर हे एअर फेयरपेक्षाही जास्त आहे.

चला जाणून घेवूया...देशातील प्रमुख 7 शहरांतील divyamararthi.comचा Ground Report...

प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त बोझा...
उदाहरण- भोपाळ एक्सप्रेने तुम्ही भोपाळहून दिल्लीला जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता प्रीमियम तत्काळमध्ये तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला कोणत्याही कॅटगरीमध्ये तीन पट जास्त रुपये मोजावे लागतील. 2nd एसीचे तिकीट तर एअर इंडियाच्या फ्लाइटपेक्षाही महाग आहे.

खाली दिलेला टेबल पाहा...
क्लासनॉर्मल तिकीटप्रीमियम तत्काळचे भाडे (रुपयांत)उपलब्ध बर्थ
स्लीपर395115332
3rd AC104029215
2nd AC148044563

बर्थची संख्या घटत जाताच तिकीट दरात वाढ होते. भोपाळ ते दिल्ली या एअर इंडियाच्या फ्लाइटचे सोमवार रात्रीचे तिकीट 3679 रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...काय आहे प्रीमियम तत्काळ?
कसे वाढवले जाते तिकीटाचे दर?
तिकीट दर एअर फेअरपेक्षा जास्त
बातम्या आणखी आहेत...