आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत जेवण देण्याची परवानगी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - धावत्या रेल्वेत काही कंपन्या जेवण पुरवत आहेत. रेल्वेची परवानगी असल्याचा त्यांचा दावा असतो. परंतु कोणत्याही कंपनीला अशी परवानगी देण्यात आली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. एखाद्या प्रवाशाने बाहेरून जेवण मागवले आणि तो आजारी पडला तर त्यास रेल्वे जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेच्या डायल-ए-मील योजनेचा हवाला काही कंपन्या देत आहेत. देशपातळीवर कमसुम, ट्रॅव्हल खाना डॉट कॉम, थालीवाला डॉट कॉम आणि मेराफूडचॉइस डॉट कॉमसारख्या वेबसाइटवर जेवणाचे बुकिंग करण्यात येत आहे. या कंपन्या फोन केल्यानंतरही जेवणाची ऑर्डर घेतात. या कंपन्यांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. रेल्वे बार्डाचे पीआरओ अनिल सक्सेना यांनी याबाबत सांगितले की, रेल्वेने कोणत्याही कंपनीला परवानगी दिलेली नाही. तसेच डायल-ए-मील योजना आम्ही सुरूच केलेली नाही. प्रवाशांत संभ्रम निर्माण
करून कंपन्या व्यवसाय करत असल्याचे सक्सेना यांनी या वेळी म्हटले आहे.