आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला शौचालयाजवळच आहे रेल्‍वेचे किचन, असे तयार होते जेवण, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- रेल्‍वेने प्रवास करताना आपण स्‍टेशनवर विकले जाणारे खाद्यपदार्थ खरेदी करत असाल तर, सावधान! आम्‍ही कानपूर रेल्‍वे स्टेशनवरील किचनची तपासणी केली असता, काही धक्‍कादायक बाबी समोर आल्‍या आहेत. या स्‍टेशनवरील किचन हे महिला टॉयलेटच्‍या शेजारी तयार करण्‍यात आले आहेत. किचनमध्‍ये कशा परिस्‍थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात याचा आढावा आमचे सहयोगी संकेतस्‍थळ dainikbhaskar.com ने घेतला आहे.

महिला टॉयलेटशेजारी आहे किचन...
- कानपूर रेल्‍वे स्‍टेशनचे किचन हे महिला टॉयलेटच्‍या अगदी शेजारी आहे.
- खाद्यपदार्थ तयार करून पॅकिंग करणारे कर्मचारी चप्‍पल घालूनच सर्व कामे करतात.
- अशातच टॉयलेटमधून वाहणारे पाणी कर्मचा-यांच्‍या चपलांनी किचनमध्‍ये पोहोचते.

असा होता किचनमधील सीन
- किचनमध्‍ये एक कर्मचारी चप्‍पल घालून डब्ब्यात खाद्यपदार्थ पॅक करत होता.
- भाजी, पुरी, लोणचे, भात आदी पदार्थ उघड्यावरच ठेवण्‍यात आले होते.
- भांडी धुतात त्‍या ठिकाणी भात ठेवण्‍यात आला होता.
- या किचनमध्‍ये खाद्यपदार्थ कधी तयार केले असतात, याचा अंदाज बांधणेही कठीण.
- किचनमध्‍ये काम करणा-या एका महिलेने सांगितले,"शौचालयातून बाहेर येणारे पाणी कधीकधी किचनमध्‍येही येते. त्‍यामुळे आम्‍हालाही मोठा त्रास सहन करावा लागतो. टॉयलेट बाजूलाच असल्‍याने किचनमध्‍ये दुर्गंधी येते. येथे बसणेही कठीण होते."

विकले जातात शिळे पदार्थ
- दुपारी एक वाजेपर्यंत जेवण तयार करून प्रत्‍येक फलाटावरील स्‍टॉलवर पाठवले जाते.
- त्‍यानंतर किचन बंद केले जाते.
- दुपारी 2 वाजल्‍यानंतर येथे खाद्यपदार्थ तयार केले जात नाहीत.
- एकाने नाव न सांगण्‍याच्‍या अटीवर माहिती दिली की, "शिल्‍लक राहिलेले अन्‍न सकाळी गरम करून स्‍टॉलवर पुरवले जाते."

रेल्‍वे कर्मचारी येथे जेवत नाहीत..
- रेल्‍वे किचनमध्‍ये काम करणा-या कर्मचा-यांचे म्‍हणने आहे की, ते त्‍यांचा टिफीन घरून घेऊन येतात.
- येथे कोणीही कर्मचारी जेवण करत नाही.
- प्रवाशी म्‍हणतात - रेल्‍वेकडून मिळणारे जेवण लवकर खराब होते.
- काही पदार्थांचा दुर्गंध येत असल्‍याने ते आरोग्‍यासाठी हानीकारक आहेत.
- वरुण यादव या प्रवाशाने सांगितले की, " फूड पॅकेटमधील पदार्थ हे अत्‍यंत बेचव असतात. पूरीही कडक पडलेली असते. ती लवकर तुटत नाही. भाजीदेखिल बेचव असते."
अधिकारी काय म्‍हणतात..
- मुख्य वाहतूक व्यवस्थापक जितेंद्रकुमार याच्‍याशी संपर्क केला असता ते म्‍हणाले, " आमचे सफाई कामगार 24 तास स्‍वच्‍छता करत असतात. ठिकठिकाणी आपल्‍याला सफाई कामगार काम करताना दिसतील."
- किचनच्‍या बाजूला असलेल्‍या महिला शौचालयाबाबत बोलताना ते म्‍हणाले, " नाही, असे काही नाही तेथेही स्‍वच्‍छता व्‍यवस्‍थित होते. तरीही त्‍याकडे आणखी लक्ष दिले जाईल."

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रेल्‍वे स्‍टेशनच्‍या किचनमध्‍ये कसे तयार होते जेवण..
बातम्या आणखी आहेत...