आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकची पुन्हा आगळीक, 3 जवान शहीद, एकाची विटंबना; अतिरेक्यांकडे 2 हजारांच्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/नवी दिल्ली - जम्मू-कश्मीरच्या कुपवाडातील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमा कृती पथकाने (बॅट) भारतीय गस्ती पथकावर दबा धरून हल्ला केला. त्यात तीन जवान शहीद झाले. नंतर एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी सैनिक पळून गेले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हल्ल्याला बळी पडलेले जवान ५७ राष्ट्रीय रायफल्सचे होते. अवघ्या २४ दिवसांपूर्वी २९ ऑक्टोबर रोजी पाक सैन्याच्या मदतीने शिपाई मनदीप सिंहची हत्या करून त्यांचे शव छिन्नविच्छिन्न केले होते. ती घटनाही माछिल सेक्टरमध्येच घडली होती.
२९ सप्टेंबर रोजी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर आजवर १८ जवान सीमेवरील गोळीबार आणि हल्ल्यात शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबरला उरीतील कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.
माछिल सेक्टर : तोच परिसर, पुन्हा तशीच घटना
२९ ऑक्टोबर रोजी भारतीय सैन्याला गाफिल ठेवून केलेल्या हल्ल्यात १७ शीख रेजिमेंटचे
जवान मनदीप सिंह शहीद झाले होते. तोच हा माछिल परिसर. अतिरेक्यांनी त्यांचे पार्थिव छिन्नविच्छिन्न केले होते. मंगळवारी ५७ राष्ट्रीय रायफल्सच्या गस्ती पथकावर पाकिस्तानच्या सीमा कृती पथकाने हल्ला करून एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली.

सकाळी १०.३० ते ११.०० वा. झाला हल्ला
गस्त पथक सकाळी १०.३० - ११.०० च्या सुमारास माछिल सेक्टरमध्ये निघाले होते. पाकिस्तानी लष्कराचे जवान व अतिरेकी आधीपासूनच दबा धरून बसले होते. त्यांनी तीन जवानांवर गोळीबार केला. यात तिघे शहीद झाले. हल्लेखाेरांनी एका जवानाच्या पार्थिवाची विटंबना करून ते पाकिस्तानला नेले.
पुढे वाचा, अतिरेक्यांकडे सापडल्या २ हजारांच्या नव्या नोटा...
बातम्या आणखी आहेत...