आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवसाच्या एक दिवसआधीच शहीद झाला जवान, पाकड्यांनी मृतदेहाची केली विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जम्मू-कश्मीरच्या कुपवाडातील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमा कृती पथकाने (बॅट) भारतीय गस्ती पथकावर दबा धरून हल्ला केला. त्यात 57 आरआरचे तीन जवान शहीद झाले. नंतर एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी सैनिक पळून गेले.

शहीद जवानांमध्ये जोधपूर जिल्ह्यातील शेरगड तालुक्यातील खीरजा खास गावातील प्रभुसिंह याचा समावेश आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी प्रभुसिंह यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.

वाढदिवसाच्या एक दिवसआधीच या जवानाला आले वीरमरण....
- प्रभूसिंह शहीद झाले त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचा वाढदिवस होता.
- लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमा कृती पथकाने (बॅट) भारतीय गस्ती पथकावर दबा धरून हल्ला केला. त्यात 57 आरआरचे तीन जवान शहीद झाले. नंतर एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी सैनिक पळून गेले.
- 13 राजपुताना रायफलमध्ये दाखल झालेले प्रभूसिंह मागील काही दिवसांपासून 57 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते.
- मंगळवारी ते आपल्या दोन सहकार्‍यांसोबत पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पाक सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला.

पुढील स्लाइडवर वाचा....माछिल सेक्टर : तोच परिसर, पुन्हा तशीच घटना
बातम्या आणखी आहेत...