आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची अवकाश मोहीम सावकाश!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारताची दुसरी चांद्रमोहीम स्थगित करण्यात आली आहे. रशियाकडून मिळणार्‍या लँडरची उपलब्धता न झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. देशी बनावटीच्या रॉकेटला कार्यान्वित होण्यासाठीदेखील आणखी काही काळ लागणार आहे.

भारताने रशियाच्या मदतीने अवकाश कार्यक्रमाला गती दिली आहे. देशाला पहिल्या चांद्रयान मोहिमेत चांगले यश आल्यानंतर चांद्रयान-2 ची घोषणा करण्यात आली होती. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा रशियाच्या मदतीने गतिमान करण्याची भारताची योजना आहे, परंतु त्याला वेळापत्रकानुसार अद्याप यश आलेले नाही. पहिल्या चांद्रयान कार्यक्रमाची दुसरी विस्तारित मोहीम मानली जाते. इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी चांद्रयान-2 मोहिमेची तारीख स्पष्ट करण्यास नकार दिला.


‘जीएसएलव्ही’ची बांधणी
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्वबळावर जीएसएलव्ही तंत्रज्ञानावर आधारित रॉकेटची निर्मिती सुरू केली आहे, परंतु त्याला लँडरची गरज भासणार आहे. त्याअगोदर जीएसएलव्हीची किमान दोन वेळा प्रायोगिक उड्डाणे होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला चांद्रयान-2 साठी वापरता येऊ शकेल. म्हणूनच देशी बनावटीच्या रॉकेटसाठी अवकाश मोहिमेला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2010 मध्ये इस्रोला जीएसएलव्हीच्या प्रयोगात अपयश आले होते. त्यामध्ये एक देशी व दुसरे रशियन बनावटीचे इंजिन वापरण्यात आले होते.