आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Team Performance Analysis For World Cup 2015

...अशाने वर्ल्ड कप कसा जिंकणार, जाणून घ्या टीम इंडियातील कमतरता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - बचावात्मक शॉट खेळताना धोनी. - Divya Marathi
फोटो - बचावात्मक शॉट खेळताना धोनी.
ऑस्ट्रेलियापाठोपाठ टीम इंडियाला इंग्लंडकडूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात असूनही अद्याप तेथील वातावरणाशी भारतीय खेळाडू एकरूप होताना दिसत नसल्याचे दिसते आहे. विश्वचषकाला एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ज्या मैदानांवर किंवा देशात वर्ल्डकप होतोय, तेथेच दोन महिन्यांपासून क्रिकेट खेळायला मिळणे यापेक्षा चांगली संधी टीम इंडियाला मिळणार नाही.

कसोटी मालिकेपासून खराब कामगिरी सुरू
कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाची वन डे मध्येही निराशाजनक कामगिरी सुरू आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिरंगी मालिका सुरू होण्यापूर्वीच म्हटले होते की, विश्वचषकातील कामगिरी ही स्थानिक परिस्थितींवर अवलंबून असेल. पण भारताच्या क्रिकेटपटुंना एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, असा सर्व चाहत्यांचा प्रश्न आहे.
पराभवाची कहानी
या धोनीसेनेला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून पराभूत केले तर इंग्लंडने 9 गडी राखून धूळ चारली. टीम इंडियाच्या खेळाडुंची बॉडी लँग्वेज पाहूनही ते पूर्ण आत्मविश्वासाने खेळत असावेत असे वाटत नाही. ऑस्ट्रेलियातील मैदानांचा अंदाज लावणे अद्यात भारतीय क्रिकेटपटुंना जमलेले नाही. पुढील महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाचे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ, टीम इंडिच्या अशी काही त्रुटी ज्या दूर होणे अत्यंत गरजेचे आहे...