आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pix: इराकमध्ये 30 तास काम करायला लावायचे, थकल्यावर लोखंडी गजाने बेदम मारायचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( इराकमधून परतलेले कमलदीप सिंह आणि जगप्रित सिंह आपला पासपोर्ट दाखवताना. ) - Divya Marathi
( इराकमधून परतलेले कमलदीप सिंह आणि जगप्रित सिंह आपला पासपोर्ट दाखवताना. )
जालंधर - सलग तीस तासापर्यंत काम. गजाने मारहाण आणि खाण्‍याची दैना. इराकमध्‍ये ड्रायव्हरची नोकरीसाठी गेलेल्या पंजाबी युवकांना एका कंस्ट्रक्शन कंपनीमध्‍ये अशा नरक यातना भोगव्या लागल्या. जीव वाचवून भारतातील जालंधरमध्‍ये पोहोचलेल्या युवकांनी आपली आपबीती, असे सांगितले. ISISचे दहशतवादी आमच्यापर्यंत पोहोचले नाही. पण ज्या कंपनीसाठी काम करायचो त्यातील अधिका-यांनीच जीवन नरक बनवून टाकले होते. इराकमधून जालंधरमध्‍ये कमलदीप सिंह, जगप्रीत सिंह, मनजीत सिंह, मनदीप सिंह, बलदेव सिंह, बलविंदर सिंह, विनोद कुमार व कुलदीप सिंह हे युवक सुखरूप पोहोचले. जालंधर स्टेशनवर पोहोचलेल्या युवकांची एसडीएम नीरज गुप्ता आणि तहसिलदार सीमा सिंह यांनी त्यांच्या कुटूंबाच्या सदस्याशी भेट घालून दिली.

ड्रायव्हर पदाच्या नोकरीसाठी दिल्लीतील एक एजंटने इराकमध्‍ये पाठवले होते. राजधानी बगदादमध्‍ये पोहोचताच एमटेक कंस्ट्रक्शन कंपनीकडे आम्हाला सुपूर्द करण्‍यात आले. येथून नफज शहरात कामासाठी पाठवण्‍यात आले. सुरूवातीच्या पंधरा दिवसांमध्‍ये 17-17 तास काम करून घेण्‍यात आले. नंतर तर तीस तासांपर्यंत काम करून घेण्‍यास सुरूवात केले होते. एका छोट्याशा खोलीत दहा-दहा जण राहत होतो. निश्चित केलेला तीनशे डॉलर पगाराऐवजी दीडशे डॉलर दिले जायचे, अशी आपबीती कमलदीप व जगप्रीत या दोघा भावंडांनी सांगितले.

कंपनी फक्त दोन वेळचे जेवण देत असे. रात्री गरम पाणी आणि बिस्किटाने भूक भागवायचो. आमच्यातील कोणी थकला तर त्याला लोखंड गजाने मारले जायचे. घरातील लोकांशी बोलू दिले जात नव्हते. थकल्याने अनेकांचा अपघातही झाला. झोप नसल्याने एकाचे मशीनमध्‍ये बोटे कापली गेली.कंपनीच्या अधिका-यांकडे मदत मागायचो तर ते म्हणायचे, तुम्हाला पैसे देऊन खरेदी करण्‍यात आले आहे. जितके काम आम्हाला हवे आहे, ते करून घेणार ,अशी आपबीती सिंह यांनी सांगितले.

कर्नाटकच्या युवकाने पासपोर्ट चोरून दिला
याच कंस्ट्रक्शन कंपनीत कर्नाटकचा काशू नावाचा युवक होता. त्यांने आम्हाला 15 पासपोर्ट चोरून द‍िले. कामाच्या ठिकाणाहून कसेतरी जीव वाचवून पळालो आणि जाफर नावाच्या इराकी माणसाला भेटलो. त्याच्याकडून बाराशे डॉलरमध्‍ये भारताकडे परतायचे तिकिट घेतले. नऊ जण विमानात बसले. एकाची तब्येत बिघडल्यांने त्याला दुबईमध्‍ये उतरवण्‍यात आले. आठ जण अहमदाबाद विमानतळावर उतरलो आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. येथे आम्ही थकलेल्या अवस्थेत बसलो होतो. पीरामल हेल्थचा सिक्युरिटी अधिका-यांनी आमच्याकडे पाहिले. त्यांने आमच्याकडे विचारपूस केली आणि जेवण्‍यास दिले. जालंधरचे तिकिट काढून दिले.

पुढील स्लाइडमध्‍ये पाहा जीव वाचवून जालंधरमध्‍ये पोहोचलेल्या युवकांची छायाचित्रे.....