आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कुस्ती CHAMPION, लहानपणी लोक उडवायचे टिंगल... मारायचे टोमणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा) - हरियाणाची राजधानी चंदीगडपासून फक्त 10 किलोमीटरवर बलाली गाव आहे. येथील एक मुलगी आज देशाची अॅथलीट स्टार आहे. आम्ही बोलत आहोत स्टार रेसलर गीता फोगट विषयी. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन गीताने इतिहास रचला होता. आज (15 डिसेंबर) गीताचा 26 वा वाढदिवस आहे.
लिंगभेद आणि स्त्री पुरुष असमानता यामुळे स्त्रीभ्रूण हत्येसाठी कुख्यात हरियाणाच्या या गावातील फोगट कुटुंबातील मुलीने जेव्हा कुस्तीच्या अखाड्यात पाय ठेवला तेव्हा सर्वांनीच परंपरा आणि रिती-रिवाजाचे दाखले देत तिला कुस्ती पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर मुलांसारखी कुस्ती खेळते म्हणून तिला बेशरम म्हटले गेले, अनेक टोमणे ऐकावे लागले. मात्र, समाजातून अशी अवहेलना आणि टीका होत असतानाही फोगट कुटुंब मुलीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्या पाठबळावरच गीताने गावाचेच नाही तर देशाचे नाव जगात गाजवले.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिला महिला खेळाडू
भारताकडून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली गीता ही पहिली महिला खेळाडू ठरली होती. कर्णम मल्लेश्वरीने ऑलिम्पिक मेडल जिंकले तेव्हा गीताचे वडील महाविरसिंह यांना विश्वास वाटला, की एक दिवस आपली मुलगी देखील पदक विजेती होऊ शकते. त्यानंतर त्यांनी घरातच तयार केलेल्या अखाड्यात मुलीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तेव्हा गीताचे वय 13-14 वर्षे होते. महाविरसिंह हे देखील नावाजलेले मल्ल आहेत. त्यांनी राज्यस्तरावर अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. तेच मुलीचे कोच झाले. राष्ट्रकुल खेळांमध्ये गीताने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तिच्या आग्रहाखातर महाविरसिंह यांनी तिला पटियाला येथील एनआयएस येथे प्रशिक्षणासाठी पाठवले.
दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरले
गीता फोगट हे नाव जर तुम्ही अजून ऐकले नसेल तर, 2010 मध्ये दिल्लीत झालेले कॉमनवेल्थ गेम्स आठवा. त्यातील पदक विजेत्यांच्या नावाची यादी पाहा. त्यात तुम्हाला गीताचे नाव नक्की दिसेल. गीता फोगट भारताची पहिला महिला पैलवान ठरली जिने 55 किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गीता फोगटची छायाचित्रे..