आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या भारतीयावर गोळीबार, गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात येथील समीर अटलांटा येथील एका स्टोरमध्ये काम करतो. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
गुजरात येथील समीर अटलांटा येथील एका स्टोरमध्ये काम करतो. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- अमेरिकेतील अटलांटा येथे सोमवारी रात्री एका भारतीयावर गोळीबार करण्यात आला. हा भारतीय एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करतो. या भारतीयाला गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्टोअरमध्ये शिरलेल्या समाजकंटकांनी केला गोळीबार

- गुजरातचा असलेला समीर हंसमुख पटेल (वय. 24) हा अटलांटा येथील एका स्टोअरमध्ये काम करतो. कामासाठी तो 3 वर्षांपुर्वी अमेरिकेत आला होता. 
- रात्री समीर स्टोर बंद करत असताना दोन समाजकंटक आत शिरले आणि त्यांनी कॅश-रजिस्टर ओढण्याचा प्रयत्न केला. समीरने विरोध केल्यावर त्यांनी गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरुन फरार झाले.
- समीरचे कुटुंब हे पाटन येथील सुंधेर गावात राहते. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. सध्या त्याचे कुटुंब अटलांटा येथे जाण्याच्या तयारीत आहे.