आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील पहिली लेस्बियन Advt. व्हायरल, दोन लाख लोकांनी पाहिला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - भारतातील पहिली समलैंगिक जाहिरात (लेस्बियन अॅड) यूट्यूबवर व्हायरल झाली आहे. गेल्या 10 दिवसांत सुमारे दोन लाख लोकांनी या जाहिरातीचा व्हिडीओ पाहिला आहे.

पॅरेंट्सना भेटण्याची तयारी
या जाहिरातीमध्ये दोन समलैंगिक तरुणी आई वडिलांना भेटण्याची तयारी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या दोघी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आहे. दोघी एकमेकींबाबतच्या अपेक्षा आणि आव्हानांबाबत चर्चा करत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओचे नाव ‘द व्हिजिट’ असे आहे. 10 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत दोन लाख लोकांनी तो पाहिला आहे.

काय म्हणतात निर्माते?
हा व्हिडिओ बनवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या अविशेक घोष यांच्या मते समलैंगिकांबाबत असलेल्या पारंपरिक विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला आहे. ही संकल्पना कॉन्सेप्ट अॅड एजंसी ऑग्लिव्ही अँड माथेर बेंगळुरू यांची होती. ही अॅड प्रमोट करणारी एजंसी मायंत्राचे व्हाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) मनीष अग्रवाल यांच्या मते सोशल मिडियावर 30 लाखावर लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. एलजीबीटी राइट्स अॅक्टीव्हिस्ट अशोक राव कवी यांचे असे म्हणणे आहे की, लेस्बियन्स जोडपीही आता सोबत राहत आहेत. तसेच ते अधिकारांची लढाईही लढत आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाहिरातीतील काही PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा, जाहिरातीचा VIDEO
बातम्या आणखी आहेत...