आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indias Maharaja Express In The List Of Worlds Top Trains

जगातील टॉप Train मध्ये भारताच्या या खास गाडीचा समावेश, पाहा Inside Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे भारताची महाराजा एक्सप्रेस. - Divya Marathi
ही आहे भारताची महाराजा एक्सप्रेस.
जयपूर - भारताची महाराजा एक्सप्रेसचा जगातील टॉप रेटिंग मिळवणाऱ्या ट्रेनमध्ये समावेश झाला आहे. तर द प्लाजा न्यूयॉर्क हे श्रीमंतांसाठी सर्वाच चांगले हॉटेल ठरवण्यात आले आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या सर्वेक्षणानुसार महाराजा एक्सप्रेस अब्जाधीशांच्या आवडीनुसार या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर इस्टर्न अँड ओरिएंटल एक्सप्रेस (सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड) ला जागतिक स्तरावरील सर्वात चांगली रेल्वे ठरवण्यात आले आहे.

ट्रेनची वैशिष्ट्ये...
- महाराजा एक्सप्रेस ही जगातील प्रमुख लक्झरी रेल्वेंपैकी एक आहे.
- प्रवाशांसाठी महाराजा एक्सप्रेसमध्ये 14 केबीन आहेत.
- त्यात 5 डीलक्स केबिन, 6 ज्युनियर सुईट, 2 सुईट आणि एक मॅजेस्टिक प्रेसिडेंशियल सुईट आहे.
- 23 बोगी असलेल्या या ट्रेनमध्ये 88 प्रवासी प्रवास करू शकतात.
- महाराजा एक्सप्रेसमध्ये मयूर महल आणि रंग महल नावाचे दोन रेस्तरॉ आहेत तसेच बारही आहे.
- त्याशिवाय प्रत्येक केबीन आणि सुईटमध्ये फोनपासून इंटरनेटसह इतर सुविधा आहेत.

विविध पॅकेज...
महाराजा एक्सप्रेसमध्ये प्रवासासाठी अनेक पॅकेज आहेत. ही ट्रेन दिल्लीपासून आगरा, फतेहपूर सीक्री, ग्वाल्हेर, रणथंभोर, वाराणसी, लखनऊ, जयपूर, बिकानेर, खजुराहो आणि उदयपूर स्टेशनवर थांबते. ही ऐतिहासिक स्थळे पाहून प्रवासी रात्रीचा प्रवास रेल्वेमध्ये करू शकतात.

महाराजा एक्सप्रेस
3 रात्रींसाठी 2,75,000 पासून 8,25,000 पर्यंत.
7 रात्रींसाठी 4,50,000 पासून 16,00,000 पर्यंत.

पाच कॅटेगरी
महाराजा एक्सप्रेस देशभरात पाच कॅटेगरीमध्ये प्रवास करते. यात हेरिटेज ऑफ इंडिया, ट्रेजरर्स ऑफ इंडिया, जेम्स ऑफ इंडिया, द इंडियन पॅनोरमा आणि इंडियन स्प्लेंडर टूर यांचा समावेश आहे. या कॅटेगरीनुसार रेल्वे वेगवेगळ्या स्थळांवर जाते.

रत्नांच्या नावावर केबीनची नावे
या एक्सप्रेसच्या केबीनला रत्नांच्या नावावरून नावे देण्यात आलेली आहेत. त्यात मोती, हीरा, नीलम, फीरोजा, मुंगा आणि पुखराज यांचा समावेश आहे. यावेळी डब्यांमध्ये काही बदलही केले आहेत. जागतिक स्तरावरील इतर टॉप ट्रेनमध्ये ब्लू ट्रेन (दक्षिण आफ्रिका), प्राइड ऑफ आफ्रिका (रोवोस रेल), द ओरिएंट एक्सप्रेस (युरोप आणि टर्की) यांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या लक्जरी ट्रेनचे PHOTO