आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील आठवे आश्चर्य: हा तरूण आहे भारतातील सर्वात उंच व्यक्ती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ- भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणा-या 35 वर्षीय धर्मेंद्र सिंह याच्यासाठी त्याची उंचीच आता समस्या बनली आहे. त्याच्या उंचीमुळेच त्याला ना नोकरी मिळत आहे ना लग्न होत आहे. त्याची परिस्थिती इतकी बिघडू लागली आहे त्याने आता रोज 300 रूपयाप्रमाणे सर्कसमध्ये काम करणे सुरु केले आहे. मूळचा यूपीतील प्रतापगढमध्ये राहणा-या धमेंद्रची उंची आहे तब्बल आठ फूट आणि एक इंच है. त्याने हिंदीत एमए केले आहे.
काही दिवसापूर्वी मेरठमधील नौचंदी यात्रेत धर्मेंद्र आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता. त्याच्यासोबत सेल्‍फी घेण्यास लोकांची झुंबड उडाली होती. त्यासाठी त्याने 10 रूपये तिकीट ठेवले होते. यात्रेत लोकांना आकर्षित करण्यासाठी धर्मेंद्रने आपल्या छायाचित्रासोबत जगातील आठवे आश्चर्य असे लिहलेली पोस्टर लावली होती.
वडीलांची उंची 6 फूट-
धर्मेंद्रचे म्हणणे आहे की, आठ लोकांच्या कुटुंबात माझे वडील सर्वात उंच होते. वडीलांची उंची 6 फूट होती. धर्मेंद्रने सांगितले की, माझी उंची लहानपणी जेव्हा झपाट्याने वाढू लागली तेव्हा मला घरच्यांनी डॉक्टरांकडे नेले. मात्र, डॉक्टर काहीही करू शकले नाहीत. माझ्यासाठी हा चमत्कारच होता.
उंची जास्त असल्याने मिळेना नोकरी-
धर्मेंद्रने आपल्या उंचीबाबत तक्रार करताना सांगितले की, आता माझ्या उंचीमुळेच मला नोकरी मिळत नाहीये. सरकारने मला यासाठी काहीही मदत केली नाही. एमए पास असूनही केवळ मी खूपच उंच असल्याने जागोजागी मला नोकरीवरून नाकारले गेले. अशा वेळी मला जगणे अवघड झाले. अखेर मी उदरनिर्वाहासाठी लोकांना माझे उंच शरीर दाखवू लागलो. यात्रेत लोकांना चित्रविचित्र गोष्टी पाहायला आवडतात म्हणून मी तेथे शो करू लागलो. त्यातून मी काही पैसे मिळवतो. जेव्हा यात्रा नसतात तेव्हा घरचे काम करतो, असे धर्मेंद्रने सांगितले.
पुढे वाचा, धर्मेंद्र सिंहला रोज लागते एक लीटर दूध, चार अंडे...
बातम्या आणखी आहेत...