आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी PAKचा पाहुणचार घेत होते, भारताचे गृहसचिव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)
नवी दिल्ली - 26 नोव्हेंबर 2008 रोजी इस्लामाबादेत भारत पाकिस्तानच्या गृह सचिवांदरम्यानची बैठक संपली होती. त्यानंतरच मुंबईत सीमापलिकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला केला होता. एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा हल्ला झाला त्यावेळी भारताचे होम सेक्रेटरी राहिलेले मधुकर गुप्ता आणि इतर काही प्रमुख अधिकारी त्याठिकाणी पाहुणचार घेत होते. एवढेच नाही तर गुप्ता आणि इतर अधिकाऱ्यांनी मुरी येथील हिल रिट्रीटमध्ये एका दिवसाचा मुक्काम वाढवला होता.

कोणत्याही वरीष्ठ अधिकाऱ्याकडे उत्तर नाही
- दोन इंग्रजी वृत्तपत्रांनी हा खुलासा केला आहे. हा खुलासा धक्कादायक असण्याचे कारण म्हणजे मुंबईवरील हल्ल्याच्यानंतर साडे सात वर्षांनी ही माहिती समोर आली आहे. तसेच कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या विषयावर काहीही उत्तर नाही.
- त्यावेळी होम मिनिस्ट्रीमध्ये राहिलेल्या एका वरिष्ठ अधिकऱ्याच्या मते, जर चर्चा संपली होती तर भारताचे शिष्टमंडळ त्याठिकाणी का थांबले हा प्रश्न उभा राहतो.
- त्यावर गुप्ता 26 नोव्हेंबरला म्हणाले होते की, त्यांना मंत्र्यांशी केवळ 27 नोव्हेंबरला बोलता येणार होते.
- एका दुसऱ्या ब्युरोक्रॅटने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय डेलिगेशनला दोन दिवस इस्लामाबादेत थांबायचे होते. त्यानंतर पाकिस्तानचा प्लॅन त्यांनी मुरी येथील हिल रिसॉर्टमध्ये शिफ्ट करण्याचा होता. पाकिस्तानसारखा विचार केला तर त्यांचा उद्देश 26/11 हल्ल्यात भारताकडून लवकर पावले उचलली जाऊ नये यासाठी केलेला हा प्रयत्न होता.

हे अधिकारी होते, पाकिस्तानात
- पाकिस्तान होम सेक्रेटरी मधुकर गुप्ता यांच्याशिवाय अतिरिक्त सचिव (बॉर्डर मॅनेजमेंट) अनवर एहसान अहमद, जॉइंट सेक्रेटरी (इंटर्नल सेक्युरिटी) दीप्ति विलास आणि भारतीय इंटरनल सेक्युरिटीशी संबंधित अधिकारी होते.
- एखा अधिकाऱ्याने तर मुरीमध्ये फोनला सिग्नलही चांगली मिळत नसल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...