आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरांचे असे जुळले फिरोज गांधींशी \'बंध रेशमाचेSS\', पाहा Rare Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी 1942 मध्ये फिरोज गांधींशी लग्न केले होते. फिरोज आणि इंदिरा गांधी यांची भेट मार्च 1930 मध्ये झाली होती, जेव्हा स्वातंत्र्य लढ्यात एका कॉलेजसमोर आंदोलन करणाऱ्या कमला नेहरू बेशुद्ध झाल्या होत्या. त्या वेळी फिरोज गांधी यांनी त्यांची देखभाल केली होती. कमला नेहरू यांना टीबीचा आजार झाल्यावर फिरोज भुवाली येथील टीबी सॅनिटोरियममध्ये त्यांच्यासोबत राहिले आणि जेव्हा कमला नेहरू उपचारांसाठी युरोपात गेल्या, तेव्हा तेथेही त्यांना भेटायला गेले. स्वातंत्र्यसेनानी आणि माजी सांसद फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी झाला. तर 8 सप्टेंबर 1960 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या फक्त 48व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला फिरोज गांधींशी निगडित विशेष माहिती देत आहे.
 
- 1936 मध्ये कमला नेहरू यांचे निधन झाले तेव्हा फिरोज गांधी तिथे उपस्थित होते. बहुतेक याच कारणाने इंदिरा गांधी प्रभावित झाल्या आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- या नात्यासाठी इंदिरा यांचे वडील जवाहरलाल नेहरू तयार नव्हते, तरीही इंदिरा यांनी वडिलांच्या मर्जीविरुद्ध मार्च 1942 मध्ये लग्न केले.
- यानंतर महात्मा गांधी यांनी इंदिरा आणि फिरोज यांना आपले गांधी आडनाव दिले. मग, पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही हे लग्न मान्य केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इंदिरा गांधी आणि फिरोज यांचे रेअर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...