आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींचे पत्र उघड, शीख नेत्यांच्या चर्चेसोबतच सुरु होती \'ब्ल्यू स्टार\'ची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर/चंदीगड - आतापर्यंत अशीच माहिती समोर आली होती, की ऑपरेशन ब्ल्यू स्टार आधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दमदमी टकसाळचे प्रमुख जरनेलसिंग भिंडरावाला यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी काय लिहिले होते, हे मात्र कधीच उघड झाले नव्हते. हे पत्र प्रथमच 'भास्कर'ला मिळाले आहे. यातून स्पष्ट होते, की इंदिरा गांधी एकीकडे श्री दरबार साहेबमधून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होत्या तर, दुसरीकडे त्यांची शीख नेत्यांशीही बोलणी सुरू होती.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारची तयारी 1983 मध्ये सुरू झाली होती. त्यावर अंमलबजावणी 3 जून 1984 पासून सुरु झाली. ब्रिटन सरकारच्या माहितीतून हे देखील स्पष्ट झाले आहे, की 1983 मध्ये इंदिरा गांधींनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर सरकारकडून मदत मागितली होती. श्रीमती गांधींच्या आग्रहावरुन थॅचर यांनी दोन लष्करी अधिकार्‍यांना सल्ल्यासाठी अमृतसरला पाठविले होते. त्यांनी ऑपरेशनची रणनीती ठरविण्यासाठी सल्ला दिला होता. मात्र, काँग्रेसने हे कधीही मान्य केलेले नाही. दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनीही ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये आमचा सहभाग नसल्याचा खुलासा केला आहे. काँग्रेसचे म्हणणे होते, की तो तत्कालिन निर्णय होता.
काय म्हणाले होते टोहडा
टोहडा म्हणाले होते, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर, खालसा पंथ व नेहरु कुटूंबात जवळीक वाढेल. टोहडा यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रात शीखांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर खालसा पंथ आणि नेहरु कुटुंबात जवळीक वाढण्यास मदत होईल. लौंगोवाल यांनीही श्रीमती गांधी यांना मे 1983 मध्ये एक पत्र लिहिले होते. त्यात नऊ मागण्या करण्यात आल्या होत्या.

पुढील स्लाइडमध्ये, फेब्रुवारी ते मे 1983 दरम्यान लिहिलेली पत्र