आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indira Gandhi News In Marathi, Congress, Divya Marathi

इंदिरा गांधी हत्येवरील चित्रपटावर बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - पंजाबी चित्रपट ‘कौम द हीरे ’ झळकण्यापूर्वीच वादात सापडला आहे. १९८४ च्या परिस्थितीवर आधारित चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू संघटना तसेच राजकीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र केंद्र सरकारने या वादग्रस्त चित्रपटावर बंदी घातली आहे.

भाजपचे नेते लक्ष्मीकांत चावला यांनी केंद्रीय गृहमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून िचत्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. िचत्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पंजाबमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. त्याशवाय पंजाब युवा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमजितसंह चौधरी यांनीदेखील पंतप्रधानांना पत्र पाठवून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. चित्रपटामध्ये गुन्हेगारांना नायकाच्या रूपात मांडण्यात आले आहे. दुसरीकडे इंटरनॅशनल शीख फेडरेशन ऑफ पंजाबच्या म्हणण्यानुसार मात्र हा चित्रपट वास्तवावर आधािरत आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी आणण्यात येऊ नये, असे या संघटनेचे म्हणणे आहे.

गृह मंत्रालय आणि आयबीकडे सादर : सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला अगोदरच मंजुरी दिली आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये गृह मंत्रालय आणि मािहती मंत्रालयाच्या अिधका-यांना हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय आणि आक्षेपार्ह दृष्ये पािहल्यानंतर मािहती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदीचा निर्णय घेतला.