आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indo US Joint Military Exercise \'Yudh Abhyas 2014\' Begins

भारत-अमेरिकेतील संयुक्त लष्करी प्रशिक्षणाला रानीखेतमध्ये सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : संयुक्त लष्करी प्रशिक्षणादरम्यान भारत-अमेरिकेचे सैनिक
देहरादून - भारत-अमेरिकेचा संबंधांना एक नवी उंची मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यात विविध प्रयत्न करण्यात व्यग्र आहेत. तर भारतातही दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. भारतात सध्या भारत आणि अमेरिकेच्या सैनिकांचे संयुक्त लष्करी प्रशिक्षण सुरू आहे.

भारत आणि अमेरिकेच्या जवानांचे संयुक्त प्रशिक्षण शिबिर सध्या रानीखेत (उत्तराखंड) च्या चौबट्टिया मध्ये सुरू आहे. दोन दिवसांच्या या शिबरात भारतीय सेनेची गरुड डिव्हीजन/सूर्या कमांड सहभागी झाली आहे. लष्कराती सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लष्करांमधील दहा संयुक्त प्रशिक्षणापैकी हे एक आहे. उद्या 30 सप्टेंबरला याचा समारोप होणार आहे.

सेंट्रल कमांडचे मेजर जनरल अश्विनी कुमार यांनी अमेरिकेच्या सैनिकांचे स्वागत केले आणि व्यायामाद्वारे लष्करी उद्देश प्राप्त करण्यात हातखंडा मिळवण्यासाठी दोन्ही दलांनी प्रयत्न करावे असे सांगितले. दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांच्या विचारांचे आणि तंत्राचे आदान प्रदान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादाविरोधात रणनीती
दोन्ही देशांच्या सैनिकांच्या तुकड्यांनी काऊंटर टेररिस्ट ऑपरेशन्सचा सराव केला. हा सराव संयुक्त राष्ट्रांच्या माउंटेनस ट्रेननुसार केला जात आहे. दोन आठवडे चाललेल्या या सरावातून अमेरिकेच्या ब्रिगेड हेडक्वार्टरच्या सैनिकांनी तंत्र आणि रणनीतीच्या आधारावर दहसतवादी कारवायांचा निपटारा करणे शक्य असल्याचे दाखवून दिले. यात काही खास शस्त्रांच्या वापराबरोबर नव्या उपकरणांच्या वापराबाबतही माहिती दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा सरावाची छायाचित्रे...