आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS, पाहा इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे चेंदामेंदा झालेले डबे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- उत्तर प्रदेशातील पुखरीयाजवळ रविवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास इंदूरहून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या पाटणा-इंदूर राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 63 प्रवाशांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मृतांचा आकडा 100 हून जास्त असू शकतो, अशी भीती देखील वर्तवली जात आहे.

यूपीचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) दलजीत सिंह चौधरी यांनी सांगितले की, 3 ते 4 दरम्यान हा अपघात झाला. अपघातात 63 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवाशी रेल्वेमध्ये अडकून आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघाताची अधिक माहिती अद्याप हाती आली नाही, मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे चेंदामेंदा झालेले डब्यांचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...