आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात भीषण अपघात: इंदूरपासूनच चाकांचा खडखडाट; उरईमध्ये झाली होती 20 मिनिटे तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- पुखराया स्थानकावर इंदूरहून पाटण्याला (राजेंद्रनगर) जात असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेला अपघात झाला. 14 डबे रुळावरून घसरले. काही डबे एकमेकांत घुसले. 25 मीटर दूरपर्यंत शेतात डबे विखुरले होते. या अपघातात 126 जण ठार झाले. सुमारे 200 जखमींपैकी 76 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचे म्हणणे आहे की, इंदूरहून रवाना होताच काही चाकांतून खडखड आवाज ऐकू येत होता. मंदसौर जिल्ह्यातील सीतामऊ येथील प्रकाश शर्मांनी दावा केला की, त्याची तक्रार एस-२ डब्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली होती. एक्स्प्रेस रेल्वेत असेच आवाज येतात, असे उत्तर त्यांना मिळाले. ते दुपारी सव्वाचारला उज्जैनला उतरले.

दिलीप, परमानंद या प्रवाशांसह अनेकांनी सांगितले की, इंदूर येथूनच रेल्वेची चाल असामान्य वाटत होती. झाशी उरईत तशी तक्रारही केली होती. सुनीलने सांगितले, मोठ स्थानकाआधी आवाज झाला आणि गाडी थांबली. जनावराने गाडीला धडक दिली, त्यामुळे पाइप तुटला, असे सांगण्यात आले. उरई स्थानकावर प्रवाशांनी रेल्वेला त्याची माहिती दिली होती. उरईत २० मिनिटांपर्यंत गाडी थांबली. दुरुस्तीनंतर गाडी तेथून रवाना झाली. पुढे जात असतानाही चाके अडखळत होती. ४० किमी पुढे अपघात झाला. पण झाशीचे उपस्थानक अधीक्षक ए. डेव्हिड यांनी अशी तक्रार आल्याचा इन्कार केला.

जखमींना मदतीच्या नावावर ५०० च्या जुन्या नोटा दिल्या
- या रेल्वेत १२६६ प्रवासी होते. त्यापैकी ३०८ जणांचे एसी डब्याचे आरक्षण होते. अपघातानंतर अनेक गाड्या रद्द कराव्या लागला. काहींचेमार्गबदलावे लागले.
- ६९४ प्रवाशांनी इंदूर-पाटणा एक्स्प्रेसमध्ये ऑनलाइन बुकिंग केली होती. फक्त १२८ जणांनीच प्रवासी विमा काढला होता. त्यानुसार ९२ पैशांतच १० लाखांचे प्रवासी विमा कवच मिळते.
- रुग्णालयात जखमींना अज्ञात लोकांनी ५०० च्या जुन्या नोटा दिल्या. जखमी आशा मिश्रा आणि अनिल यांना कोणीतरी ५०० च्या १०-१० नोटा दिल्या. जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले की, रेल्वेतर्फे आलेली मदत असे सांगून त्यांना नोटा देण्यात आल्या.
- जखमींच्या मदतीसाठी एसबीआयने रविवार असतानाही रुग्णालयात मोबाइल एटीएमची व्यवस्था केली. कानपूरमध्ये बीओबीनेही ही सुविधा दिली.
- अनेक लोक घटनास्थळी जखमींना बिस्किटे वाटप करत असल्याचे दिसले.

कटाची शंका, चौकशी करा : जोशी
- रूळ बदलले होते का की रेल्वे, केंद्राला बदनाम करण्यासाठी कट केला आहे? रेल्वे मंत्रालयाने चौकशी करावी. - मुरली मनोहर जोशी, भाजप
- केंद्रसरकार बुलेट ट्रेन चालवण्याची योजना तयार करत आहे. पण सामान्य गाड्यांचे अपघात रोखू शकत नाही. - राजीव शुक्ला, काँग्रेस
- मला हा कट वाटत आहे. रेल्वे रुळावरून उतरल्यावर एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होत नाहीत. घटनेच्या मुळाशी जावे. - राजेन गोहेन, रेल्वे राज्यमंत्री
- ड्रायव्हरला जर्क जाणवला. रुळाला तडे हे त्याचे कारण असू शकते. हिवाळ्यात अपघाताचे कारण रूळ फ्रॅक्चर असते. - मनोज सिन्हा, रेल्वे राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...