आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चालकाच्या इशाऱ्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 126 जणांच्या जिवावर बेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर/इंदूर/ पाटणा - प्रवासी अगदी गाढ झोपेत होते. अचानक आवाज झाला. इंदूरहून पाटण्याला जाणाऱ्या रेल्वेच्या 14 बोगी रुळावरून घसरल्या. अनेक बोगी दबल्या, दुमडल्या गेल्या. काही कोच दुसऱ्या कोचवर चढले. या भीषण दुर्घटनेत 126 प्रवाशांचा मृत्यू झाला. 200 हून अधिक जखमी झाले. यापूर्वी २०१० मध्ये प. बंगालमध्ये अशाच अपघातात १४८ प्रवासी मृत्युमुखी पडले होते.

वीज तारा ट्रिप झाल्या नसत्या तर सबंध रेल्वे पेटली असती
रात्री सुमारे 1 वाजता रेल्वे चालकाने धोक्याचे संकेत दिले होते. झाशीहून निघाल्यानंतर दोन स्टेशनवर इंजिन चालक जलत शर्मा यांना अधिक लोड दिसला. त्यांनी सहकारी डी. पी. यादव यांना सांगितले. यानंतर झाशी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. मात्र, अधिकाऱ्यांनी कसेतरी करून कानपूरपरर्यंत रेल्वे आणा, असे सांगितले. चालकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, रात्री 3.30 वाजता ओएचई केबलचा मोठा स्फोट झाल्यानंतर मी इमर्जन्सी ब्रेक लावले. खाली उतरून पाहिले तर १14 बोगींची अत्यंत वाईट अवस्था होती. ताशी 110 किमी वेग असताना हा अपघात झाला.


स्लीपर कोचचे सर्वाधिक नुकसान...
- यूपीचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) दलजीत सिंह चौधरी यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान स्लीपर कोचेसचे झाले आहे. मृतांची संख्या 45 झाली आहे. तसेच जखमींची संख्या जास्त आहे. परिणाम मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सिटिंग/लगेज कम्पार्टमेंट, GS, GS, A1, B1/2/3, BE, S1, S2, S3, S4, S5, S6 कोचचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

कुठे झाला अपघात
- नॉर्दन सेंट्रल रेल्वेचे प्रवक्ता विजय कुमार यांनी सांगितले की, कानपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर कानपूर-झांसी रेल्वे स्टेशनदरम्यान पुखरीयामधील सुबरजवळ पहाटे 3 वाजता हा अपघात झाला.
- 50 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी असल्याची माहिती आहे.

अनेक रेल्वे गाड्या रद्द
- अपघातामुळे रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. काही किलोमीटर पर्यंत रुळ उखडला आहे.
- कानपूर-झांसी पॅसेंजर ट्रेनसह या मार्गवरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज् आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...