आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POK मधून घुसले 60 आत्मघातकी हल्लेखोर, 4 ठिकाणी एन्काऊंटर सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल हायवेवर पंपोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर लष्कर-ए-तोएबाकडून झालेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. - Divya Marathi
नॅशनल हायवेवर पंपोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर लष्कर-ए-तोएबाकडून झालेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये 60 घुसखोर असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आर्मी, सीआरपीएफ, बीएसएफसह सुरक्षा यंत्रणांचे जवान आहेत. बुधवारी खोऱ्यातील चार ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणि घुसखोरी करुन आलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

नॅशनल हायवेवर करत आहेत हल्ला
- कुपवाडा, लोलाब, माचिल आणि नौगाव येथे एन्काऊंटर दरम्यान मोठ्या प्रमाणात फौजफाटा बोलावण्यात आला आहे.
- आर्मी आणि पोलिसांनी संपूर्ण श्रीनगर आणि नॅशनल हायवेवर हाय अलर्ट जारी केला आहे.
- दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेच्या 35 किलोमीटर परिसराला सतत लक्ष्य केले आहे.
- पंपोर ते बिजबेहरा भागातील परिसरात दहशतवाद्यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये 6 वेळा हल्ले केले.
- काही दिवसांपूर्वी पाक व्याप्त काश्मीरमार्गे घोसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी पंपोर हल्ला घडवून आणला होता.
- 25 जून रोजी लष्कर-ए-तोएबाच्या हल्लेखोरांनी सीआरपीएफच्या बसला लक्ष्य केले. त्यात 8 जवान शहीद झाले तर, 22 जखमी झाले.

यंत्रणा शोधत आहे दुजानाला
- गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या इनपूटनंतर यंत्रणांनी लष्कर-ए-तोएबाचा डिव्हिजनल कमांडर अबु दुजानाचा शोध सुरु केला आहे.
- अशीही माहिती आहे, की 25 जून रोजी सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात दुजानाचा हात होता.
- सूत्रांचा दावा आहे की पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांन मोठ्या प्रमाणात मदत करणारा दुजाना हाच आहे.
- तो दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांच्या हलचाली, कँप, सुरक्षा आणि हल्ल्यांच्या जागांची माहिती देतो.
- अशीही माहिती आहे की पंपोर हल्ल्यामागे हाफिज सईदचा जावई खालिद वहीद याचा हात होता आणि दुजाना त्याची मदत करत होता.
- पंपोर हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सीआरपीएफने याची चौकशी एनआयएकडून करण्याची मागणी केली.
डेथ झोन आहे 35 किलोमीटर हायवे
- इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीर नॅशनल हायवे 300 किलोमीटर लांब आहे. मात्र दहशतवादी फक्त बिजबेहारा ते पंपोर या 35 किलोमीटरमध्ये हल्ला करतात.
- दक्षिण काश्मीरमधील हा भाग सुरक्षा यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या 7 महिन्यांमध्ये येथे 6 हल्ले झाले आणि 12 जवान शहीद झाले.

केव्हा-केव्हा झाले हल्ले
- 25 जून- पंपोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला. 8 जवान शहीद आणि 22 जखमी झाले होते.
- 3 जून- बिजबेहारा येथे बीएसएफ च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 3 जवान शहीद झाले होते.
-8 एप्रिल - आर्मीच्या एका वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात दोन नागरिक जखमी झाले होते.
- 2 फेब्रुवारी - पंपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. त्यात दोन जवान शहीद झाले होते.
- 3 डिसेंबर 2015- पंपोर येथे हायवेवर दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीर पोलिसांना लक्ष्य केले होते. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते.
- 9 डिसेंबर 2015- पोलिस आणइ सीआरपीएफने एका कारला इंटरसेप्ट केल्यानंतर 2 दहशतवाद्यांचा एन्काऊंटर केला होता.
पुढील स्लाइडमध्ये, पंपोर येथील हल्ल्याचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...