आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Infiltration Bid Foiled By Forces In J&K 4 Terrorists Killed Search Operation News And Updates

काश्मीरमध्ये बुऱ्हाणचा साथीदार सब्जारसह 10 अतिरेकी टिपले, चकमकीनंतर 50 हून अधिक ठिकाणी दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सब्जार ठार झाल्यानंतर खोऱ्यात हिंसाचार, दगडफेक सुरू झाली. ते हिंसक वातावरण पाहून ही शाळकरी चिमुरडी प्रचंड धास्तावली. दहशतीने तिची गाळण उडाली. - Divya Marathi
सब्जार ठार झाल्यानंतर खोऱ्यात हिंसाचार, दगडफेक सुरू झाली. ते हिंसक वातावरण पाहून ही शाळकरी चिमुरडी प्रचंड धास्तावली. दहशतीने तिची गाळण उडाली.
श्रीनगर - भारतीय लष्कराने जम्मू-काश्मिरात अतिरेक्यांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करून तीन मोहिमांत २४ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा केला. बारामुल्लाच्या रामपूर सेक्टरमध्ये लष्कराने नियंत्रण रेषेवर घुसखोरी करू पाहणाऱ्या ६ अतिरेक्यांना ठार केले. यात हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर सब्जार अहमद बटचा समावेश आहे. कुख्यात अतिरेकी बुऱ्हाण वाणीचा तो साथीदार होता. त्याचा खात्मा हे लष्कराचे मोठे यश मानले जात अाहे.
 
पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दल व अतिरेक्यांत झालेल्या चकमकीत सब्जार साथीदारासह मारला गेला. गेल्या जुलैमध्ये अनंतनागमध्ये मारला गेलेला हिजबुल कमांडर बुऱ्हाण वाणीच्या जागी सब्जारला कमांडर बनवण्यात आले होते. त्याने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सामू गावात ४२ राष्ट्रीय रायफल्सच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. सुरक्षा दलांनीही प्रत्त्युत्तरादाखल कारवाई केली. संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला. रात्रभर थांबून थांबून गोळीबार होत राहिला. सकाळी सुरक्षा दलांनी अतिरेकी लपून बसलेल्या घराला लक्ष्य केले आणि दोन अतिरेक्यांना ठार केले. ते सब्जार अहमद बट फैजान बट असल्याची ओळख पटली. यापूर्वी एक दिवस अगोदर शुक्रवारी लष्कराने बॅटचे दोन अतिरेकी उरीमध्ये ठार केले होते. दरम्यान, चकमकीच्या विरोधात हुरियतने दोन दिवस बंदची हाक दिली आहे. अफवा पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा प्रीपेड मोबाइल बंद केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव काश्मिरातील रेल्वेसेवाही बंद करण्यात आली आहे.
 
घुसखोरीचाप्रयत्न उधळला, अतिरेकी ठार: लष्कराने नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा अतिरेक्यांचा खात्मा केला. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, जवानांनी शुक्रवारी रात्री रामपूर सेक्टरमध्ये पाकव्याप्त काश्मिरातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसलेले अतिरेकी पाहिले होते. त्यांना शरणागती पत्करायला सांगितल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. लष्कराच्या उलट कारवाईत अतिरेकी मारले गेले. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

चकमकीनंतर ५० हून अधिक ठिकाणी दगडफेक
सब्जारच्या चकमकीनंतर दक्षिण काश्मिरात ५० ठिकाणी दगडफेक झाली. चकमक सुरू होताच डझनांवर गावकरी त्रालच्या सोइमोह गावात पोहोचले. येथेच चकमक सुरू होती. जमावाने दगडफेक सुरू केली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पॅलेट गनचा वापर केला. त्यात अनेक गावकरी जखमी झाले. या घटनेनंतर शाळांना सुटी दिली. हिंसाचाराच्या भीतीने कार्यालये व दुकानेही बंद झाली. बुऱ्हाण वाणी ठार झाल्यानंतर काश्मिरात सहा महिन्यांहून जास्त काळ बंद व हिंसाचार होत राहिला. अतिरेक्याचा मृतदेह मागत जमावाने जवानांवर दगडफेक केली.

हुरियत नेत्यांच्या भेटीसाठी श्रीनगरला गेला होता सब्जार
गुप्तचरांच्या अहवालनुसार, सब्जार हुरियत नेत्यांना भेटण्यासाठी श्रीनगरला गेला होता. गुप्तहेर संस्था त्याच्यावर पाळत ठेवून होत्या. हुरियत व हिजबुलमध्ये वाद सुरू होता. हिजबुल कमांडर जाकीर मुसाने फुटीरतावाद्यांनी अतिरेक्यांच्या संघर्षात हस्तक्षेप केला तर त्यांचे मुंडके उडवू अशी धमकी दिली होती. सब्जार तोच वाद सोडवण्यासाठी श्रीनगरला गेला होता. तेव्हापासून गुप्तहेर त्याच्यावर पाळत ठेवून होते.
 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मरण्याआधी कुटुंबीयांची मागितली माफी...

हे पण वाचा.. 
 
बातम्या आणखी आहेत...