आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलवामाच्या राजपोरा पोलिस ठाण्याजवळ पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.  या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. (फाइल) - Divya Marathi
पुलवामाच्या राजपोरा पोलिस ठाण्याजवळ पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. (फाइल)
श्रीनगर -  सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेजवळ काश्मीरच्या उडी सेक्टरमध्ये बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला. लष्कर आणि पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले की, एलओसीजवळ जवान गस्त घालत होते. त्यांना घुसखोरीचा प्रयत्न दिसला. त्यांनी शरण येण्यास सांगितले, पण दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांना ठार मारले. एलओसीच्या पलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत.

पुलवामामध्ये पोलिसांच्या तुकडीवर हल्ला.. 
- 4 नोव्हेंबरला पुलवामाच्या राजपोरा पोलिस ठाण्याच्या जवळ पोलिसांच्या तुकडीवर हलस्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि एक जखमी आहे. शहीद जवानाचे नाव अब्दुल सलाम आहे. पोलिसांच्या मते, पोलिस स्टेशनजवळ असलेल्या एका नाक्यावर दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. 
- शनिवारीही दहशतवाद्यांनी शोपियांमध्ये पोलिसांच्या तुकडीवर ग्रेनेड फेकले होते. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या इमाम साहिब एरियामध्ये असलेल्या कॅम्पवर ग्रेनेड फेकण्यात आले. भिंतीवर आदळल्यामुळे ब्लास्ट झाला पण हानी झाली नाही. 

3 वर्षांत 183 जवान शहीद 
नोयडाचे आरटीआय अॅक्टीव्हीस्ट रंजन तोमर यांच्या एका अर्जावर गृह मंत्रालयाने नुकतेच उत्तर दिले होते. त्यात गेल्या तीन वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत 183 जवान शहीद झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याशिवाय 62 नागरिकही मारले गेले. हा आकडा आंकडा मे 2014 पासून मे 2017 पर्यंतचा आहे. 

काश्मीरमध्ये 275 दहशतवादी अॅक्टीव्ह 
न्यूज एजन्सीने काही दिवसांपूर्वी सुत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की, काश्मिरमध्ये सुमारे 275 दहशतवादी अॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 250 फक्त पीर पंजाल रेंजमध्ये आहेत. 2017 मध्ये आतापर्यंत 291 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 80 यशस्वीही झाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...